मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा लढा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात त्यांनी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना बोलणेही अवघड जात आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी असलेल्या ११ हजार ५०० नोंदी सापडल्या असून त्यांना प्रमाणपत्र दिले जातील, असे स्पष्ट केले. त्यावर अर्धवट आरक्षण घेणार नाही. संपूर्ण आरक्षण घेणार, हाच माझा शब्द आहे. त्यामुळे सर्वानाच सरसकट प्रमाणपत्र द्या, असे मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले. त्याचवेळी एका प्रश्नाला हिंदीत उत्तर देताना मैं खपाखप बोलता, घोडे लगाता…असेही सुनावले.
मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरांवर पलटवार केला आहे. आमचे लोक शांततेच आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या वाचाळवीरांना आवरावं, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले. दरम्यान, न्या. शिंदे समितीला मुदतवाढ देण्यास आमचा विरोधच आहे, असेही जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. तसेच राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा आमचा काही संबंध नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले.
‘सरकार म्हणत आहे, थोड धीर धरा. पण विश्वास कसा ठेवायचा? पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येऊनही मराठा आरक्षणावर बोलले नाहीत. तुम्ही त्यांना सांगितले असते तर ते नक्कीच बोलले असते. तुम्ही पंतप्रधानांना सांगू शकत नाही तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा?’ असा सवाल जरांगे-पाटील यांनी केला. त्याचवेळी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एकाचा जीव गेला तरी चालेल, कारण न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, अशी प्रतिक्रिया जरांगे-पाटील यांनी दिली. तेव्हा त्यांचे पाणावलेले डोळे पाहून सर्वांना गहिवरून आले.
हे ही वाचा
जरांगेंची प्रकृती खालावल्याने महिलेने फोडला हंबरडा, विष पिण्याचा दिला इशारा
मराठा आरक्षण झाले सोपे, १५ हजार कागदपत्रांमुळे आशा पल्लवीत…
दरम्यान, जरांगे-पाटील यांनी काहीही झाले तरी आता माघार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. हैदराबादी हिंदीत उत्तर देताना जरांगे-पाटील यांनी थेट सरकारवर आसूड ओढले. आता अर्धवट आणि तर संपूर्ण आरक्षण घेणार. मुदतवाढ किती देणार? ४० दिवस दिले, ४० वर्षे झालीत. आणखी किती? असा सवाल त्यांनी केला. जरांगे-पाटील यांनी अंतवाली सराटी गावात २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला होता. त्यानंतर हे आंदोलन एकदम प्रकाशझोतात आले. तेव्हापासून जरांगे-पाटील यांनी महायुती सरकारला जेरीस आणले आहे.