28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरराजकीय'छगन भुजबळांना मतदान करणार नाही'

‘छगन भुजबळांना मतदान करणार नाही’

राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण पेटले आहे. मराठा समाजाला सरकसकट कुणबी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-patil) यांनी मोर्चे आंदोलन केले होते. मात्र सरकार आरक्षणाच्या गप्पा करत असल्याचा आरोप मराठा समाजातील बांधवांनी केला आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गात (OBC) मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी मागणी केली जात असताना, दुसरीकडे ओबीसी समाजातील बांधवांनी मोर्चे काढले आहेत. यावरून ओबीसी समाजातील नेते छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मतदान न करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. त्यानंतर आता मनोज जरांगेंना मराठा आरक्षणाची धुरा हातात देण्याबाबत सकल मराठा समाजाने निर्णय घेतला आहे. तर वकील गुणरत्न सदावर्तेंवर (Gunaratna sadavrte) बहिष्कार टाकण्यात आला आहे. असा निर्णय मुंबईत मराठा आरक्षण हक्क परिषदेने घेतला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षण हक्क परिषदेने मनोज जरांगे-पाटील यांना मराठा आरक्षणाची धुरा दिली आहे. तर जातनिहाय गणना व्हावी, यामुळे मराठा लोकसंख्या लक्षात येईल. राज्यात सध्या ओबीसी नेते मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत आहेत. यावर नेमके काय करता येईल यावर या परिषदेत चर्चा करता येईल. यानंतर ठराव पास करण्यात येईल, असे काळकुटे म्हणाले आहेत.

हे ही वाचा

‘जगाला माहितीये की माझी जात कोणती आहे; मी लपवू शकत नाही’

‘मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामाचे दर्शन घ्या’; भाजपकडून ऑफर?

सुप्रिया सुळेंचे आरक्षणासाठी सरकरला गाऱ्हाणे

मराठा आरक्षण हक्क परिषद ठराव

मनोज जरांगे-पाटील आरक्षणाचे नेतृत्व करतील

लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे

कुणबी दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे

आतापर्यंत आरक्षण कसे दिले याची श्वेतपत्रिका सरकारने द्यावी.

छगन भुजबळांना आम्ही मतदान करणार नाही. सदावर्तेंवर बहिष्कार टाकण्यात येईल.

१९९४ साली शदर पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिले होते. त्यांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिले होते. त्या पद्धतीने आरक्षण द्यावे. पंतप्रधान नरेद्र मोदी हे त्यांचे मित्र आहेत. त्यांनी त्यांची मदत घेऊन आरक्षण द्यावे.

मराठा आरक्षणावेळी मराठा समाजातील बांधवांवर गुन्हे दाखल केले होते ते मागे घ्यावे. असे काही ठराव मराठा आरक्षण हक्क परिषदेत घेण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी