मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केले असून सरकारला आरक्षणाबाबत ४० दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही काहीच झाले नाही. म्हणुन आता जरांगे-पाटलांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणास सुरूवात केली. दरम्यान, अनेक सरकार आले आणि सत्तापालटही झाली मात्र मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळाले नाही. उद्धव ठाकरे सरकारच्याकाळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. मराठा बांधव आत्महात्या करू लागले आहेत. यामुळे आता आरक्षणावरून त्यांचा संयम देखील सुटू लागला आहे. राज्यातील काही भागात आंदोलनाला वेगळं वळण लागले आहे. आता मराठा बांधवच नाही, तर सिनेकलाकारांनी आरक्षणाच्या लढाईत उडी घेतली आहे.
राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून उपोषण, आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजाच्या बाजूने आता धनगर समाजही एकवटून आरक्षणाची मागणी करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार असल्याची शपथ आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली. यामुळे आता मराठा समाजाला सरकाकरकडून आरक्षण मिळण्याबाबत आपेक्षा वाढू लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण टिकले नव्हते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर हे सरकार आरक्षण देणार का? असा सवाल उपस्थित होतो. यावरून काही नेत्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे. अशातच आता बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
हे ही वाचा
मराठा आरक्षण: सर्वपक्षीयांच्या बैठकीत अजित पवारांच्या जागी शरद पवार
सरकारच्या उलट्या बोंबा, निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांनी केली चिरफाड !
काय म्हणाला रितेश देशमुख?
अभिनेता रितेश देशमुख हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो. मात्र आता रितेश देशमुखने मराठा आरक्षणाबाबत ट्वीट केल्याने अधिकच चर्चेला उधाण आले आहे. त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो, असे मत ट्वीटच्या माध्यामातून केले आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने देखील पोस्ट करत आपले मत व्यक्त केले आहे.
जय शिवराय,
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽 pic.twitter.com/Qffzej8Y4k— Riteish Deshmukh (@Riteishd) October 30, 2023
दिग्दर्शक हेमंत ढोमे काय म्हणाला?
आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय..
मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…
त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे!सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत!
शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये!
जय शिवराय! pic.twitter.com/uTa1OlZ9Sy— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) October 31, 2023
राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमेने देखील अपले मत व्यक्त केले, आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय.. मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत! शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!