30 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरराजकीयमराठा आरक्षण: शिष्याच्या मदतीला धावला गुरू

मराठा आरक्षण: शिष्याच्या मदतीला धावला गुरू

राज्य सरकारने सोमवारी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय सहमती मिळवण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलवली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे यावर एकमत झाल्यावर मंगळवारी अंतरवाली सराटी येथे ‘सरकारी दूत’ म्हणून संभाजी भिडे पोहचले आणि त्यांनी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे अशी विनंती केली. संभाजी भिडे आणि भाजपा कनेक्शन नवे नाही. पावसाळी अधिवेशनाच्या आठवड्यापूर्वी याच भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. तेव्हा त्यांना अटक करण्याची मागणी विरोधकांनी विधीमंडळात लावून धरता, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच भिडे यांच्या मदतीला धावून आले होते.

या संदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तुम्हाला पृथ्वीराज बाबा म्हणतात आता तुम्हाला बाबा का म्हणतात याचा काही पुरावा आहे का त्यामुळे गुरुजी (bhide) यांना गुरुजी का म्हणतात याचा पुरावा काय हवा.. ते आम्हाला गुरुजी वाटतात म्हणून आम्ही गुरुजी म्हणतो’ असे उत्तर दिले. त्यामुळे भिडे यांच्यावर काहीही करवाई झाली नाही. आता मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचा आरोप असणाऱ्या आणि अडचणीत आलेल्या फडणवीस यांच्या मदतीला हेच भिडे  धावून आले आणि ‘ शिंदे लबाड नाही, देवेंद्र फडणवीस बेईमान नाहीत, अजित पवार काळजी असलेला माणूस!’ असे सर्टिफिकेट देऊन मोकळेही झाले. फडणवीस यांनी अडचणीच्या काळात भिडे यांना वाचवले होते. त्याची परतफेड भिडे यांनी केल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात दिवसभर होती.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अमरावतीमध्ये बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्या नंतर गेल्या तीन दिवसांपासून भिडे यांच्या विरोधात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) रस्त्यावर उतरून आंदोलन केले  होते. भिडे यांना अटक करावी अशी मागणी राज्यात जोर धरू लागली होती. असे असताना या प्रकरणाचे पडसाद २ ऑगस्ट रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. दोन्ही सभागृहात भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. पण याबाबत निवेदन करताना, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भिडे यांनी पाठराखण केल्याचे पहायला मिळाले होते.

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याबाबत अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात आणि ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘पोलीस चौकशी करत आहे मात्र कोणीही कोणत्याही राष्ट्रपुरुषांची केलेली बदनामी खपवून घेतली जाणार नाही मग ती सावरकरांची असो की महात्मा गांधींची’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले होते.

संभाजी भिडे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या मागणीनंतर सभागृहात निवेदन केले होते. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्या पुस्तकातील काही उतारे वायरल होत असल्याचे सांगितले तर त्यांचे एक भाषण व्हायरल होत असून त्या भाषणात त्यांनी ज्योतिबा फुले यांची आणि महात्मा गांधी यांचे बदनामी केल्याचे दिसून येत आहे. मात्र हे भाषण अमरावती जिल्ह्यातील केलेल्या सभेतील नाही ते अन्य ठिकाणचे आहे त्याबाबतचे आवाजाचे नमुने पोलीस तपासत असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली होती.

मनोहर कुलकर्णी यांचा वारंवार संभाजी भिडे गुरुजी असा उल्लेख देवेंद्र फडणवीस करत होते. याला पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला होता. ‘अशा व्यक्तीला गुरुजी संबोधने योग्य नाही तो गुरुजी आहे याचा पुरावा आहे का’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारले होते. या संदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘तुम्हाला पृथ्वीराज बाबा म्हणतात आता तुम्हाला बाबा का म्हणतात याचा काही पुरावा आहे का, त्यामुळे त्यांना (भिडे) गुरुजी म्हणतात त्याला पुरावा काय हवा.. ते आम्हाला गुरुजी वाटतात म्हणून आम्ही गुरुजी म्हणतो’ असे उत्तर दिले. यामुळे सभागृहामध्ये एकच गदारोळ झाला. विरोधकांना यावेळी बोलू न दिल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला होता.
हे सुद्धा वाचा
संभाजी भिडेंनी सरकारला वाटले सर्टिफिकेट; एकनाथ शिंदे लबाड नाही, फडणवीस बेईमान नाहीत, अजित पवार काळजी असलेला माणूस!
संभाजी भिडे आले सरकारच्या मदतीला धावुन, मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचे केले आवाहन!
मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री शिंदे

हे अधिवेशन संपून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरीही भिडे यांच्यावर करवाई काही झाली नाही. गांधीजींच्यानावाने राजकारण करणारे कॉँग्रेसवाले शांत झाले. पण गुरुजीला (संभाजी भिडे) आपला शिष्य (देवेंद्र फडणवीस) मराठा आंदोलन प्रकरणी अडचणीत आलेला आहे ही बाब निदर्शनास येताच, आधी त्यांनी त्यांच्या श्री शिवप्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे यासाठी ते थेट अंतरवली सराटीत दाखल झाले आणि उपोषण सोडण्यासाठी जरांगे यांना विनंती करत असल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी