30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरराजकीयनामवंत मराठी कलाकारांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

नामवंत मराठी कलाकारांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मराठी सीनेसृष्टीत वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेल्या काही मराठी कलाकारांनी एकत्र येत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये अभिनेते राजेश भोसले, अभिनेत्री व निर्माती शर्मिष्ठा राऊत, अभिनेते योगेश शिरसाट, अभिनेत्री अलका परब, अभिनेते शेखर फडके, अभिनेते केतन क्षीरसागर यांचा समावेश होता. यासमयी शिवसेना सचिव सुशांत शेलार देखील उपस्थित होते.

सिनेसृष्टीत धडपड करणाऱ्या कलावंतांच्या राहण्याचा प्रश्न आहे, तसेच इतर काही प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. त्यावर काही उपाय काढण्याची विनंती करणार आहोत. त्याचप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कलावंतांचे प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही सर्वजण अभिनेते सुशांत शेलार यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आणि शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे मत कार्यकर्त्या कलाकारांनी मांडले.

नामवंत मराठी कलाकारांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

दरम्यान, शिवसेना प्रवेशावेळी विनोदी कलाकार अभिनेता योगेश शिरसाट यांनी सांगितलं की, आमच्या क्षेत्रातही कष्टकरी आहेत, बरेच कलाकार असे आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आमच्या माध्यमातून तो आवाज पोहोचावा यासाठी आम्ही शिंदे साहेबांना भेटलो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे सुद्धा वाचा:

शिंदे-फडणवीसांची ‘सावरकर गौरवयात्रा’ म्हणजे ‘अदानी बचाओ यात्रा’; राऊतांचा निशाणा

अजूनही सुपर सीएम फडणवीस सांगे तैसाच सीएम शिंदे बोले!

हिंदी, मराठी वृत्तवाहिन्यांसमोर नवे संकट; अनेकांना गमवाव्या लागणार नोकऱ्या!

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी