29 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरराजकीयफडणवीसांचे नव्याने ‘पुन्हा येऊ’!

फडणवीसांचे नव्याने ‘पुन्हा येऊ’!

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता नव्याने ‘पुन्हा येऊ’ चा नारा दिला आहे. मात्र, यापूर्वी ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीस यांनी यावेळी ट्विट करून ‘आम्ही पुन्हा येऊ’ असा नारा दिला आहे. फडणवीस यांच्या या ट्विटमुळे या घोषणेवरील चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. फडणवीस असे का आणि कशासंदर्भात म्हणाले ते जाणून घेऊयात ...

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता नव्याने ‘पुन्हा येऊ’ चा नारा दिला आहे. मात्र, यापूर्वी ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीस यांनी यावेळी ट्विट करून ‘आम्ही पुन्हा येऊ’ असा नारा दिला आहे. (Devendra Fadanvis Says Punha Yeu) फडणवीस यांच्या या ट्विटमुळे या घोषणेवरील चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. फडणवीस असे का आणि कशासंदर्भात म्हणाले ते जाणून घेऊयात …

देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा राजकारणातील अतिशय गाजलेला डायलॉग आहे. राज्यातील 2019च्या विधानसभा निवडणूक प्रचारातील फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ हा डायलॉग फेमस आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड व्हायरल झाला होता. नंतर त्यांची यावरून बरीच खिल्लीही उडविली गेली होती. त्याचे मीम्सही व्हायरल झाले होते.

 

‘पुन्हा येऊ’ची नव्याने चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे पुण्यातील पोटनिवडणुकीसंदर्भातील फडणवीस यांचे ट्विटस. त्यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्रातून विजयी झालेल्या भाजप उमेदवार अश्विनीताई जगताप यांचे खुल्या दिलाने अभिनंदन करून चिंचवडवासियांचे मनापासून आभार मानले. मात्र, जिथे भाजपने 28 वर्षांपासून हक्काची जागा गमाविली, त्या कसबा पेठ मतदार संघातील जनतेने थोडे कमी आशीर्वाद दिले असल्याची नाराजी त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. मात्र, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

अर्थात, ‘आम्ही पुन्हा येऊ’ वरुन सोशल मीडियात फडणवीस यांना ट्रोल करणे सुरू झाले आहे. ट्विटरवर अंकीता सावंत ही युझर म्हणते, मी पुन्हा येईन बोला हो 😂 कसबा पराभवापेक्षा ‘आम्ही पुन्हा येऊ’ हे म्हटल्याने तुम्हाला जास्त त्रास झाला आहे, हे नक्की! डॉ. पवन म्हणतात, ‘‘पुढल्या वेळेस येताना उमेदवार बरा द्या. स्वतःच्या प्रभागात पिछाडीवर असणारा उमेदवार दिला, त्याला फक्त पक्षाकडे बघून मते द्यायची का?? बऱ्याच भाजपच्या हक्काच्या मतदारांवर काँग्रेसला मत देण्याची नामुष्की तुम्ही आणलीत. काही जणांनी नाईलाजास्तव NOTA दाबला.’’

हे सुद्धा वाचा :

मेरा पानी उतरता देख। ‘मेरे किनारे पर घर मत बसा देना ‘मैं समंदर हूँ ‘। लैटकर वापस आउॅंगा।

VIDEO : हा चिमुकला म्हणतोय; मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन

योगी आदित्यनाथ यांची भविष्यवाणी, मी पुन्हा येईन!

एका युझरने ‘‘मी च्या जागी आम्ही?’’ असा आश्चर्यकारक प्रश्न केला आहे. दुसऱ्याने, ‘आम्ही पुन्हा येऊ’ या वाक्यासाठी सर्व कटकरस्थान केले का?? असा टोला लगावला आहे. ‘‘पुन्हा या, पण चंद्रकांत दादांना आणू नका,’’ असाही सल्ला दिला गेला आहे. आशीष जरंगे याने ‘‘पुन्हा या, आम्ही पुन्हा जास्त मताने पाडू’’ असा इशारा दिला आहे. आणखी एका युझरने
‘पुन्हा येण्या’साठी आशीर्वाद थोडेच लागतात’😄 असे म्हणून टपली मारली आहे.

Devendra Fadanvis Says Punha Yeu, Mi Punha Yein, फडणवीसांचे नव्याने ‘पुन्हा येऊ’, Kasba Peth PotNivadnuk Nikal, मी पुन्हा येईन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी