31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयमंत्री गुलाबराव पाटील भडकले; रवी राणांना खडे बोल सुनावले!

मंत्री गुलाबराव पाटील भडकले; रवी राणांना खडे बोल सुनावले!

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चु कडू यांचा 50 खोक्यांचा वाद पेटला आहे, यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली असून आमदार रवी राणा यांना खडे बोल सुनावले आहेत. तुमच्या स्थानिक वादामुळे 40 आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही, तुम्ही शब्द मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चु कडू यांचा 50 खोक्यांचा वाद पेटला आहे, यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली असून आमदार रवी राणा यांना खडे बोल सुनावले आहेत. तुमच्या स्थानिक वादामुळे 40 आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही, तुम्ही शब्द मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, त्यांनी रवी राणा यांना आवर घालावा, 40 वर्षांचे करिअर पणाला लावून लोक तुमच्या सोबत आले आहेत. त्यामुळे हा वाद आता थांबवायला हवा, मी रवी राणा आणि बच्चू कडू यांना विनंती करतो की, त्यांनी आता शांत बसावे. आमदारांना पैसे मिळाल्याच्या आरोपावर गुलाबराव पाटील म्हणाले, कर्नाटकमध्ये आमदारांना पैसे मिळेल, त्यासाठी तिथे गाडी आणली होती. मग आमच्या 50 खोक्यांसाठी कोणता ट्रक आणला होता सांगा, असे आव्हान देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना यावेळी केले.

आताचे मुख्यमंत्री हात दाखवा आणि गाडी थांबा असे मुख्यमंत्री आहेत. काही लोक आम्हाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. परंतु आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ, माझे आव्हान आहे की, तुमचे अडीच वर्षांचे काम आणि आमचे 90 दिवसाची तुलना करू, तुम्ही वरचढ ठरलात तर हे सरकार खुर्ची खाली करेल असे आव्हान देखील त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना कटुता संपवावी असा अग्रलेख लिहून साद घातली आहे, यावर बोलताना यापूर्वीच अशी साद घातली असती तर आज ही वेळ आली नसती, असा टोला देखील त्यांनी लगावला.
हे सुद्धा वाचा :

Nitin Gadkari : गडकरी म्हणतात दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; पुढची निवडणूक लढण्याबाबत म्हणाले…

Kishori Pednekar : किरीट सोमय्यांनी सात दिवसात आरोप सिद्ध करून दाखवावे : किशोरी पेडणेकर

एकनाथ शिंदे माझे मित्र…!, तर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले बच्चू कडू?

विरोधी पक्षातील नेत्यांची काल सरकारने सुरक्षा काढल्याने मोठी टीका होत आहे, यावर देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नाही, एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला आनंद होत नाही, सुरक्षे संदर्भात एक कमिटी काम करते, त्यानुसार तो निर्णय होतो. या समितीच्या आलेल्या अहवालानुसारच सुरक्षा काढली असल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी