34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरण ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या...

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरण ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात कोल्हापूर येथील मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याबाबत हसन मुश्रीफ यांच्या तिघा मुलांनी आता अटक पूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घातली आहे. नावीद, आबीद आणि साजिद यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अंमलबजावणी न्यायालयात ‘ईडी’ कोर्टात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. (Minister Hasan Mushrif’s sons approach court for pre-arrest bail)

आमदार हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघात सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नावाने साखर कारखाना उभारण्यात येार होता. त्यासाठी विभागातील हजारो शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये गोळा करण्यात आले होते. ही रक्कम सुमारे ४० कोटी रुपये इतकी होती. शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले. मात्र, कारखान्याचे समभाग देण्यात आले नाहीत. ही रक्कम मुश्रीफ यांनी स्वतःच्या खाजगी कारणासाठी वापरली, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत विवेक कुलकर्णी यांनी तक्रार केली आहे. त्या अनुषंगाने २५ फेब्रुवारी रोजी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अनेकांना आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. यामध्ये हसन मुंश्रीफ हे आरोपी आहेत. तसेच त्यांच्या मुलांनाही आरोपी दाखवण्यात आलेलं नाही. मात्र, ‘ईडी’कडून अटक होईल या भीतीपोटी त्यांनी अटक पूर्व जामिनसाठी अर्ज केला आहे. मुश्रीफ कुटुंबियासाठी अँड. अमीत देसाई, आबाद फोंडा आणि अँड. प्रशांत पाटील हे युक्तीवाद करणार आहे. यावेळी ‘ईडी’चे अधिकारीही न्यायालयात हजर राहणार आहेत.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात ४० हजार शेतकरी सभासदच नाहीत. केवळ हसन मुश्रीफ, त्यांचे कुटुंबीय आणि कंपन्या अशा १७ व्यक्तीच मालक असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जिल्ह्याध्यक्ष समरजीत घाडगे यांनी केला आहे. ४० हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेऊन तब्बल ४० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. या प्रकरणाची कागदपत्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली होती.

हे सुद्धा वाचा

महत्वाची बातमी : यापुढे नोकरभरतीत ट्रान्सजेंडरनाही आरक्षण; पोलीस दलातही ‘तिसरा पर्याय’

चिंताजनक : भारत पुन्हा हिंदू विकास दराकडे; रघुराम राजन यांचा इशारा

नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची पिवळी झाली होती; रामदास कदमांचा ठाकरेंना टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी