29.5 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरराजकीयसाताऱ्यात भाजप-शिंदेगट आमने सामने! शंभुराज देसाई अन् उदयनराजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

साताऱ्यात भाजप-शिंदेगट आमने सामने! शंभुराज देसाई अन् उदयनराजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

साताऱ्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

साताऱ्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोवई नाक्यावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानाजवळ उदयनराजे भोसले यांच्या मालकिची एक इमारत आहे. या इमारतीवर सोमवारी (6 मार्च) रात्री क्रेनच्या सहाय्याने एक वॉल पेंटिंग काढण्यात येणार होते. मात्र सातारा पोलिसांनी अचानक हे पेंडिंग काढण्यास विरोध केला. विशेष म्हणजे हे पेंटिंग काढण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असल्याची बाब समोर आली. याच कारणाने उदयनराजे आणि शंभुराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विशेष म्हणजे सोमवारी रात्री क्रेनच्या सहाय्याने हे पेंटिंग काढण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र अचानक तणाव वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत पेंटिंग काढण्यास नकार दिला. त्यानंतर सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पेंटरने मंगळवारी (7 मार्च) सकाळी पुन्हा एकदा पोलिसांच्या विरोधाला न जुमानत पेंटिंगचे काम पुन्हा सुरू केले. पोलिसांनी सातत्याने पाटोळे पेंटर याला हे चित्र रेखाटण्यास विरोध केल्याने पोलिस आणि पेंटर पाटोळे यांच्या शाब्दिक युद्ध रंगले. यावेळी पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मैरत जीव देण्याचा इशारा पेंटर पाटोळे यानी पोलिसांना दिला आहे. सदर परिस्थिती जास्त तणावपूर्ण झाली असल्याचने पेंटर पाटोळे याला ताब्यात घेण्यासाठीचा दबाव पोलिसांवर वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

डॉ. विजय चोरमारे लिखीत नव्या पुस्तकाचे आज प्रकाशन !

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

विरोधकांची दडपशाही करण्याचा ‘गुजरात पॅटर्न’ महाराष्ट्रातही; नाना पटोले यांची भाजपवर टीका

दरम्यान, याप्रकरणात सध्यातरी शंभुराज देसाई किंवा उदयनराजे भोसले या दोघांपैकी एकाही व्यक्तीने थेट हस्तक्षेप केला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र घडलेल्या प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातील अनेक विषयांना अनुसरून उदयनराजे भोसले यांनी थेट महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील भुमिका घेतली होती. तेव्हापासूनच उदयनराजे भोसले भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याच्या चर्चांना उधानं आले होते. आशातंच आता सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे उदयनराजे भोसले आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण होणार का असे प्रश्न निर्माण होत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी