28 C
Mumbai
Saturday, August 26, 2023
घरराजकीयआमदार, खासदार नसलेल्या पक्षाने कार्यालयासाठी दावा का करावा? आमदार बच्चू कडू यांचा...

आमदार, खासदार नसलेल्या पक्षाने कार्यालयासाठी दावा का करावा? आमदार बच्चू कडू यांचा सवाल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या मंत्रालय समोरील कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा अचानकपणे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला देऊन टाकली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे समाजवादी परिवारात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आमदार, खासदार नसलेल्या पक्षाने कार्यालयासाठी दावा का करावा, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ‘एखाद्या पक्षाला सरकारने एखादे कार्यालय वापरायला दिले तर ते त्यांच्या मालकीचे होत नाही, गेली अनेक वर्ष ते कार्यालय बंद होते, त्यामुळे सरकारने त्या कार्यालयातील एक भाग आम्हाला वापरायला दिला तर कुठे बिघडले,’ असेही त्यांनी ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या मंत्रालय समोरील कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा अचानकपणे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला देऊन टाकली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे समाजवादी परिवारात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात जनता दल सेक्युलर पक्षाचे पाच माजी आमदार खासदार मंत्रालयासमोर आमरण उपोषण करतील असा थेट इशारा पक्षाचे राज्य महासचिव रवि भिलाणे यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता.

गेल्या महिन्यात बच्चू कडू यांनी १८ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली की, जनता दलाचे बंद असलेले कार्यालय आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाला देण्यात यावे. मात्र जनता दल कार्यालय बंद आहे ही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल आहे. खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाने हे कार्यालय कायमस्वरूपी कार्यरत असल्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देऊनही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी आदेश काढून २३ऑगस्ट रोजी या कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती पक्षाला परस्पर बहाल करून टाकली. अशी माहिती जनता दलाचे प्रभारी राज्य अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली याबाबत शेवाळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा
शिंदे गटाच्या आमदाराला बक्कळ निधी मिळाला, पण तालुक्याला पाणी मिळेना; शेतकरी वैतागले
उज्ज्वला गलांडे-पाटील मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०२३ मध्ये उपविजेत्या
ट्रॅव्हल्सला आग, महिलांची धावपळ; बाळासाहेब थोरातांच्या टीमने दुर्घटना टाळली

जनता दल सेक्युलरने राज्य सरकार आणि बच्चू कडू यांच्यावर आरोप केल्यावर प्रहार जनशक्ती पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे कडू यांना संपर्क साधला असता, ‘सरकारने एखाद्या पक्षाला कार्यालय वापरण्यासाठी दिले म्हणजे ते त्याच्या मालकीचे होत नाही. गेली अनेक वर्ष ते कार्यालय बंद होते, त्यामुळे सरकारने त्या कार्यालयातील एक भाग आम्हाला वापरायला दिला तर बिघडले कुठे’ असा सवाल केला. दरम्यान, सरकारने जनता दल यांच्या नावे देण्यात आलेल्या कार्यालयाचा मोठा हिस्सा कडू यांच्या पक्षाला दिला याविरोधात जनता दल सेक्युलर पक्ष उच्च न्यायालयात गेला आहे. पक्षाचे राज्य महासचिव रवि भिलाणे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी