32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयखासदार भावना गवळींच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला शिवसेनेत प्रवेश

खासदार भावना गवळींच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला शिवसेनेत प्रवेश

टीम लय भारी

मुंबई : आज (दि. २८ जुलै २०२२) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यासह खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) यांचे पूर्वाश्रमीचे पती (MP Bhavna Gawli’s ex-husband joins Shiv Sena) कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी देखील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. प्रशांत सुर्वे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खासदार भावना गवळी यांच्यासमोर वाशीम जिल्ह्यात तगडे आव्हान उभे राहिले आहे. खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे दहा ते बारा वर्षांपूर्वीच विभक्त झालेले आहेत.

MP-Bhavna-Gawli's-ex-husband-joins-Shiv-Sena

भावना गवळी या यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेच्या १२ खासदारांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यामध्ये भावना गवळी यांचा देखील समावेश आहे. भावना गवळी यांच्यावर ईडीची टांगती तलवार असल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याचे तसेच उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिवसेनेने भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ईडीच्या भीतीला घाबरून भावना गवळी यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे बोलले गेले.

दरम्यान, प्रशांत सुर्वे यांनी देखील २०१४ मध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण परिस्थिती तशी नसल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून ते नाकारण्यात आले, असे यावेळी प्रशांत सुर्वे यांनी सांगितले. प्रशांत सुर्वे हे मूळचे वाशीम जिल्ह्याचे असून त्यांच्यामुळे भविष्यात भावना गवळी यांना वाशीम जिल्ह्यात नक्कीच डोकेदुखी होऊ शकते, असे आता बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना देण्यात आले पद

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी; मुख्यमंत्र्यांवर अन्य मंत्री वैतागले !

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी