30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्राचं बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा...; विधानसभेच्या पायऱ्यांवर मविआची जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्राचं बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…; विधानसभेच्या पायऱ्यांवर मविआची जोरदार घोषणाबाजी

राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प बुधवार (दि.9) रोजी सादर झाला. या अर्थसंकल्पात शाश्वत शेती, शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठ्या घोषणा केल्या गेल्या आहेत. दरम्यान आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीकेला सुरूवात केली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी हातात भोपळे आणि कोहळे घेऊन आंदोलन केल आहे. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला होता. (MVA protest against the Shinde-Fadnavis government in the assembly on Mahabudget)

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने सध्या राज्यातील कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यामुळे कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे. त्यावरही सरकारनं अद्याप निर्णय घेतला आहे. त्यामुळं या दोन्ही मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या आमदारांनी बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा असल्याच्या घोषणा देत डोक्यावर भोपळे घेऊन विधानभवनाच्या पायर्‍यांवर या अर्थसंकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी हातात भोपळे दाखवून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी ‘बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा’ सह इतर घोषणा, निदर्शने करून विरोधकांनी सर्वांचे लक्ष वेधले. “महाराष्ट्राला मिळाला भोपळा, कांदा उत्पादकांना मिळाला भोपळा, कापूस उत्पादकाला मिळाला भोपळा, शेतकऱ्यांना मिळाला भोपळा” , अशा घोषणाही यावेळी विरोधकांनी केल्या. ‘सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके…’ असे फलक देखील यावेळी झळकवण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

हे सुद्धा वाचा : 

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन

सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

अवघ्या 1 रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार; शिंदे-फडवणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

गेल्या दोन दिवसांपासून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी यापूर्वी गळ्यात कांद्याच्या माळा आणि कापसाच्या माळा घेऊन आंदोलन केलं होतं. आज पुन्हा विरोधकांनी हातात भोपळे घेऊन हे आंदोलन केले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी