सभागृहाचे कामकाज सुरु होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विधीमंडळात गदारोळ सुरु झाला. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतमालाला भाव नाही त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्याचे सांगितले. त्याचबरोबर कांदा प्रश्नावरुनही विरोधी बाकावरुन सभागृहात शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. (MVA protests)
आज महाराष्ट्र अर्थसंकल्पाच्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिंदे- फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली. बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई जाहीर करा. शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..अशा वेगवेगळ्या घोषणांनी विरोधकांनी विधानभवनात गदारोळ घातला होता.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज अधिवेशनात, महिलादिनी सरकार मदत करेल, शेतकऱ्यांना दिलासा देईल असं वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर केली नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सभागृहात दुसरं मोठं काहीही नाही, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही, असे गंभीर मत देखील व्यक्त केले.
महिलादिनी सरकार मदत करेल, शेतकऱ्यांना दिलासा देईल असं वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर केली नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सभागृहात दुसरं मोठं काहीही नाही, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 9, 2023
राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाविषयी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
मविआ आमदार आक्रमक
विकासकामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा… अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे… जाहीर करा जाहीर करा नुकसान भरपाई जाहीर करा…. शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… सरकार तुपाशी शेतकरी उपाशी… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज (दि. ९) विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
हे सुद्धा वाचा :
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन
सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
मंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत