लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडलेली आहे आणि संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे असतानाच ‘लय भारी’ चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) मुख्य प्रवक्ते मेहबूब शेख यांची मुलाखत घेतली(MVA will get 32 seats, while NCP will get 9 seats).सदर मुलाखतीत महाराष्ट्रात काही कालावधीपासून चाललेल गलिच्छ राजकारण ते महाराष्ट्रातील जनतेचा रोष मतांच्या माध्यमातून दिसून येईल असेही मेहबूब शेख यांनी सांगितले.अजित पवारांसोबत उडाणटप्पू लोक आहेत त्या उलट तळागळातील व सर्वसामान्य कार्यकर्ते यांचा पाठिंबा हा शरद पवार यांच्यासोबत आहे. शरद पवार यांनी शेतकर्यांनसाठी काय केले ?अशा वारंवार उठवल्या जाणार्या प्रश्नाला ही सडेतोड उत्तर देताना मेहबूब शेख दिसतात. त्याच बरोबर भाजप ने जे काही उपद्रव महाराष्ट्रात केलेले आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलेल्या असून जनता मतांच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करणार असे मेहबूब यांनी सांगितले.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी जनतेच्या मनात सहानुभूती असल्या कारणाने महाविकास आघाडीला ३२,तर राष्ट्रवादीला १० पैकी ९ जागा मिळतील असा दावा मेहबूब शेख यांनी सदर मुलाखतीत केला आहे.
Sharad Pawar | महाविकास आघाडीला ३२, तर राष्ट्रवादीला ९ जागा मिळतील | NCP
लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडलेली आहे आणि संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे असतानाच 'लय भारी' चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) मुख्य प्रवक्ते मेहबूब शेख यांची मुलाखत घेतली.