32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरराजकीयमोदी आणि केजरीवाल कोणत्याही थराला जाऊ शकतात; नाना पटोले यांचा हल्लाबोल

मोदी आणि केजरीवाल कोणत्याही थराला जाऊ शकतात; नाना पटोले यांचा हल्लाबोल

नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. बेरोजगारी 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. जनता निराश असून देशात सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. पण देशाच्या अर्थमंत्री रूपयांची घसरण होत नाही तर डॉलर मजबूत झाला आहे असे सांगून क्रूर थट्टा करत आहेत. पटोले म्हणाले, दिल्लीचे उच्चशिक्षीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्मला सितारामन यांच्या पुढे एक पाऊल टाकत रूपयांची घसरण रोखण्यासाठी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतींचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांना या संदर्भातील कायदे आणि नियम माहित असूनही अशी मागणी करून ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी तर त्यापुढे जाऊन नोटांवर मोदींचा फोटे छापण्याची मागणी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत राज्यातील या नेत्यांची बुद्धी ही दिवाळखोरीत निघाली आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा :
Nagpur Airport : VIP कल्चर बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांचा असाही साधेपणा!

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे बळीराजाच्या भेटीला
IAS Tukaram Munde : …अशा सरकारी डॉक्टरांना डायरेक्ट डिसमिस करणार; तुकाराम मुंडे यांचा इशारा

नोटांवर फोटो छापण्याबाबत अनेकांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
भारतीय चलणी नोटांवर देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाचा फोटो छापण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केली त्यांनंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाली. दरम्यान अनेक पक्षातील नेत्यांनी नोटांवरील फोटोंबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी नोटांवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असावा अशी मागणी केली तर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नोटांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असावा अशी मागणी केली. तर भाजपचे नेते राम कदम यांनी नोटांवर मोदींचा फोटो असावा असे म्हटले आहे. भाजपचे आमदार निलेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवरायांचा फोटो असावा असे म्हटले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!