27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरराजकीयमोदींचे चुकलेच, 'बीबीसी'ची 'ती' डॉक्युमेंटरी ब्लॉक करायला नको होती; पदमभूषण विजेत्या एस....

मोदींचे चुकलेच, ‘बीबीसी’ची ‘ती’ डॉक्युमेंटरी ब्लॉक करायला नको होती; पदमभूषण विजेत्या एस. एल. भैरप्पा यांचे मत

युट्यूब, तसेच इतर व्हिडिओ शेअरिंग व टॉरंट प्लॅटफॉर्मवरुन “इंडिया : द मोदी क्वेश्चन” ही बीबीसी (British Broadcasting Corporation) डॉक्युमेंटरी ब्लॉक केल्यानंतर यासंदर्भातील ट्विट शेअरिंगही थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही डॉक्युमेंटरी ब्लॉक करायला नको होती, असे मत ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, भारताने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करायला पाहिजे होती. मोदींचे टीकाकार गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाबाबत मिग गिळून बसले आहेत, अशी टिपण्णीही त्यांनी केली. (Narendra Modi made a Mistake, He should not banned BBC’s documentary) गुरुवारी प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. मोदींमुळेच आपल्याला हा पुरस्कार मिळाला आहे. ते नसते तर हा पुरस्कार मला मिळाला नसता, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

एस. एल. भैरप्पा यांनी म्हैसूरच्या नागरिकांना हा पुरस्कार समर्पित केला आहे. मोदी सरकारची त्यांनी स्तुती केली आहे. ते म्हणाले, “आतपर्यंत जितकी सरकारे स्थापन झाली त्यामध्ये नरेंद्र मोदींचे सरकार हे सर्वोत्तम आहे. २०२९ च्या निवडणुकांपर्यंत मोदींना बहुमत मिळायला हवे. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासारखीच विचारसरणी असलेले नेतृत्व तयार केले पाहिजे. आणि त्याच्याकडे देशाचे नेतृत्व सोपविले पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

‘गोडसे’ला सुद्धा ‘ब्लॉक’ करणार का?

द मोदी क्वेश्चन : आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार वापरुन केंद्राने बीबीसी डॉक्युमेंटरी केली ब्लॉक

आता मधुमेहाला करा ‘बाय-बाय’! टाईप-१ आजाराला अटकाव करणाऱ्या औषधास अमेरिकेच्या “एफडीए”ची मान्यता

 

पद्मभूषण मिळाला म्हणून मी मोदींचे गुणगान गात नाही
नरेंद्र मोदी नसते तर मला पद्मभूषण पुरस्कार मिळालाच नसता. त्यांच्यामुळेच या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, अशा शब्दांत त्यांनी मोदींचे गुणगान केले आहे. पण मला हा पुरस्कार मिळाला म्हणून मी मोदींची स्तुती करत नाही अशी पुस्तीही भैरप्पा यांनी पुढे जोडली आहे. ते म्हणाले, “मी खूप राजकीय वाचन केले आहे. पण तरीसुद्धा माझे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीत.

‘बीबीसी’ डॉक्युमेंटरी हे षडयंत्र
बीबीसीची “इंडिया : द मोदी क्वेश्चन” ही डॉक्युमेंटरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध रचलेले षडयंत्र असल्याची टीका एस. एल. भैरप्पा यांनी केली आहे. भारत जी २० परिषदेचे नेतृत्व करत आहे. नेमकीची हीच वेळ साधून ‘बीबीसी’ची ही डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आल्याचे सूचित करून हे मोदींविरुद्धचे षड्यंत्र असल्याची टीका केली आहे. देशात समान नागरी कायदा लागू काण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचे त्यांनी समर्थन केले आहे. त्यासंदर्भात एस. एल. भैरप्पा म्हणाले की, देशातील कायदे आणि नियम अल्पसंख्यांसहित सर्व लोकांना एकसमान लागू केले पाहिजेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी