30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीय'नरेंद्र मोदी स्टेडियम 'पनवती'; भारतीय क्रिकेट रसिकांच्या चर्चा तर काही नेते मंडळींचे...

‘नरेंद्र मोदी स्टेडियम ‘पनवती’; भारतीय क्रिकेट रसिकांच्या चर्चा तर काही नेते मंडळींचे मत

देशात आयसीसी वर्ल्डकप (ICC Worldcup) २०२३ ची अंतिम फायनल लढत ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियामध्ये (India vs Austrelia) झाली. ही लढत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi stadium) (१९ नोव्हेंबर) झाली असून भारतातील सर्वात मोठे असणारे स्टेडियम म्हणून नावारूपाला आले. मात्र अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर का खेळवण्यात आला असावा. यामागे राजकीय बाबी लपल्या आहेत का? अशा अनेक चर्चा होत आहेत. जर टीम इंडियाने अंतिम सामना जिंकला असता तर मोदींमुळे जिंकला असल्याचे राजकीय वर्तुळात भासवण्यात आले असते असे राजकीय नेत्यांचे दावे आहेत. हा सामना जर वानखेडेवर झाला असता तर इंडियाने हा सामना जिंकला असता, असे अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. मात्र काही नेत्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केलं असून अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमला ‘पनवती’ (Panauti) म्हंटलं आहे. (Sujat Ambedkar)

ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया सामन्याच्या अंतिम लढतीत टीम इंडिया चांगली कामगिरी करेल आणि वर्ल्डकप जिंकेल अशा चर्चा होत्या. मात्र नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला गेला आणि येथील खेळपट्टीही फारच दुर्मिळ आणि रात्रीच्या वेळेस दव पडल्याने फलंदाजांना अधिक फायदा होतो. मात्र वानखेडेवर हा सामना असता तर अशी कोणतीही समस्या निर्माण झाली नसल्याची क्रिकेट रसिकांची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी नरेंद्र मोदी स्टेडियम पनवती आहे असे म्हटले आहे तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ‘यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली, क्रिकेटची पंढरी मुंबई. मुंबईतून क्रिकेटदेखील घेऊन जायचं हा सामना मुंबईत का नव्हता? असा प्रश्न आता संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा

‘समस्या सोडवता येत नसतील तर सत्तेतून बाहेर पडा’; वडेट्टीवारांचा भुजबळांवर रोष

घड्याळ कुणाचं? शरद पवार सुनावणीसाठी दिल्लीला रवाना होणार

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची छत्रपति संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद

तर शिवसेना सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पोळ यांनी ट्वीट करत टीम इंडियाच्या एकाही खेळाडूनं शिव्या खाल्ल्या नाहीत पण एका पनौतीनं सर्वांच्या शिव्या खाल्ल्या…. जिथं जातंय तिथं घाण करुन ठेवतंय, असे सोशल मिडियाद्वारे वक्तव्य केले होते, यामुळे २०२३ च्या वर्ल्डकपला राजकीय रंग लागला काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी