30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयआमदार कपिल पाटलांची सत्यजित तांबे यांना साथ

आमदार कपिल पाटलांची सत्यजित तांबे यांना साथ

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency Election) युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसने सत्यजित तांबे हे काँग्रेसचे उमेदवार नसल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे भाजपने आपल्या पक्षाकडून कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर आधी भाजपमधून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी नुकतीच मातोश्रीवर भेट दिल्याने आता या मतदार संघातील निवडणुकीची रंगत वाढली आहे. सत्यजित तांबे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून एकदोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यातच आता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना देखील पाठिंबा वाढत चालला असून शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील (MLC Kapil Patil) यांनी सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. (Nashik Graduate Constituency Election MLC Kapil Patil support To Satyajit Tambe)

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. काँग्रेसच्या हातात असलेला हा मतदार संघ सुधीर तांबे यांच्या माघारीमुळे काँग्रेसच्या हातून निसटला. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरत आधी मी काँग्रेसचाच असल्याचे सांगितले होते. मात्र काँग्रेसने सत्यजित तांबे हे काँग्रेसचे उमेदवार नसल्याचे जाहीर केले. सत्यजित तांबे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या देखील जोरदार प्रचाराला लागल्या आहेत. तर सत्यजित तांबे देखील घर भेटी घेत प्रचारात गुंतले आहेत. दरम्यान सत्यजित तांबे यांना शिक्षक संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. शिक्षक भारती संघटनेने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. शिक्षक भारती व जनता युनायटेड दलाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी बुधवारी (दि. १८) पाठिंब्याची घोषणा केली. तर महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) तसेच महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी देखील सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही निवडणुक अटातटीची होणार असल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

हे सुद्धा वाचा 

मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये दुप्पट वेगाने काम केले : उद्योग मंत्री उदय सामंत  

भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीगीरांची निदर्शने 

सामनामध्ये विकिपिडीयावरुन कॉपी पेस्ट करणारे संपादक; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर बोचरी टीका

नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अखेरच्या क्षणी सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच त्यांनी भाजपकडे देखील पाठिंब्याची मागणी केली होती. त्यामुळे भाजप या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना मदत करणार का हा देखील औत्सुक्याचा विषय ठरला आहे. मात्र सध्यातरी शिक्षक संघटनांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याने सत्यजित तांबे यांच्यासाठी ती आशादायी बाब ठरली म्हणावे लागेल. मात्र त्यांच्याच विरोधात असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिल्यास ही निवडणुक अटीतटीची होऊ शकते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी