राज्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळतं आहे. विरोधी पक्षनेते हे सत्ताधारी पक्षांवर तर सत्ताधारी विरोधी पक्षांवर सतत टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये देखील काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी 9 आमदारांसह बंड करत भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती करत उपमुख्यमंत्री पद संपादन केले आहे. तर काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद दिले आहे, असे वक्तव्य केले होते. यामुळे बारामती मतदार संघातून अजित पवार पार्थ पवारांना तिकीट देणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत आता आमदार रोहित पवारांनी भाष्य केले आहे.
बारामती मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. अनेक पक्षांनी या बारामती मतदारसंघ जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, मात्र ते स्वप्नच राहिले आहे. यासाठी आता अजित पवारांना सोबत घेऊन भाजप बारामती मतदारसंघात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील बारामती मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र त्यावेळी पडळकरांच्या विरोधात अजित पवार निवडणूक लढवत होते. पण आता अजित पवार भाजपला जाऊन मिळले आहेत. यावर पिंपरीतील झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांना बारामती मतदारसंघ आणि पार्थ पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर त्यांनी नागपूरचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची उदाहरणे देत चर्चेला किती महत्व द्यायचे असे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा
दांडियात महिलांची छेड काढाल, तर तुरुंगात जाल!
मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, ‘दमच निघत नाही’
दांडियात महिलांची छेड काढाल, तर तुरुंगात जाल!
काय म्हणाले रोहित पवार
पिंपरीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत रोहित पवारांना बारामती मतदार संघातून पार्थ पवारांचे नाव अधिक चर्चेत आहेत? असा सवाल विचारला असता, यावर रोहित पवार म्हणाले की, चर्चेला किती महत्व द्यायचे, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यापैकी नितीन गडकरी वगळता इतर नेत्यांचा पराभव होईल, अशी चर्चा आहे. कुणाचे पालकमंत्रीपद काढले आणि कुणाला दिले यावर संघर्ष सुरू आहे. हवेत बोलणाऱ्या बावनकुळे यांना त्यांच्या मतदार संघातून संधी मिळेल, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
घाबरलेले सर्व तिकडे निघून गेले
लोकांमधील लोकं कधी दबावतंत्राला घाबरत नाहीत, घाबरलेले सर्व तिकडे गेले आहेत. लोकांशिवाय कुणी निवडून येत नाही. लोकं शरद पवार यांच्यासोबत आहेत. यामुळे आता तिकडची अनेक लोकं संपर्कात आहेत. तिकडच्यांची देखील आता चलबिचल होऊ लागली आहे. आमच्या संपर्कात असून ते पुन्हा इकडे येतील, असे रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.