29 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरराजकीयआणखी एक पडळकर भाजपमध्ये दाखल !

आणखी एक पडळकर भाजपमध्ये दाखल !

वंचित बहुजन आघाडीतून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर सन २०१९ साली त्यांनी भाजपच्या चिन्हावर बारामतीमधून विधानसभा लढविली होती. मात्र अजित पवार यांनी मोठ्या फरकाने त्यांना चितपट केले. त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतले. पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. याच पडळकरांच्या पाठोपाठ आता वंचितमधून (Vanchit Bahujan Aghadi) आणखी एक पडळकर फुटले असून त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. (Navnath Padalkar leader of Baramati Vanchit Bahujan Aghadi joins BJP)

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर (Navnath Padalkar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नवनाथ पडळकर यांनी सन २०१९ साली वंचितच्या तिकीटावर बारामतीमधूल लोकसभा निवडणुक लढविली होती. नवनाथ पडळकर यांच्यासोबत सुधाकरराव आव्हाड, राहुल ओव्हाळ, प्रकाश राठोड, दीपक बोराडे, रामदास महानवर, अशोक कोळेकर, शेखर बंगाळे, अनिल गोयेकर, सुरज रणदिवे, गजानन देवकते, गणेश कुंभार, बाबासाहेब आल्हाट, विठ्ठल खताळ आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा

राज्यातील ८४६ शाळांच्या विकासासाठी पीएम श्री योजना; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

सत्यजीत तांबे यांचा नक्की इरादा काय? बाळासाहेब थोरातांच्या मनधरणीनंतर केले सुचक ट्विट

IAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना अभिमान, सिंधी समाजासाठी गौरवास्पद!

नवनाथ पडळकर म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्षे विविध संघटनेच्या माध्यमातून बहुजन, ओबीसी, व्ही. जे. एन. टी. एस. टी.एस.सी., अल्पसंख्याक शेतकरी, कष्टकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर राज्यभर मोर्चे, आंदोलन करुन रस्त्यावरील लढाया लढत राहिलो. सत्तेशिवाय निर्णय प्रक्रियेत प्रवेश नाही म्हणूनच या समुहांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी झालो. परंतु वंचितांना सत्ताधारी समाज बनविण्याचे प्रयत्न अपुरेच पडले. समाजाला केवळ आश्वासने देऊन फार काळ राजकारण शक्य नसते. वंचित समाजाला संधी मिळत नाही तोपर्यंत सामाजिक परिवर्तन अशक्य आहे. हाच अजेंडा घेऊन आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा केली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी