२ जून रोजी अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आणि राज्याच्या राजकारणात एकच भूकंप आला. शरद पवार यांनीच अजित पवार यांना पाठवले इथपासून ते विविध चर्चा, राजकीय समीकरणे अनेकांनी लावली. पण शरद पवार यांच्या पक्षात नक्की काय चालले आहे याचा अंदाज कुणालाही येत नाही. पुण्यात तिलक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी आले. पण अजित पवार आणि शरद पवार दोघेही एकाच व्यासपीठावर असून बोलले नाही. पण शनिवारी (१२ ऑगस्ट) पुण्यात या दोन्ही नेत्यांची एका बड्या उद्योगाच्या घरी बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित होते. या गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय चर्चाचा बाजार तेजीत आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.
माध्यमातून समोर येणाऱ्या दृश्यांवरून प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा देशात आणि राज्यात वेगळा ठसा आहे. कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. पवारांना असं जरी वाटलं की दादा आणि पवारसाहेब एकत्र येणार आहेत, तर त्यावरही ते उघडपणे भाष्य करण्याइतके सक्षम आहेत. ते तसे सक्षमपणे सांगू शकतात. लपून छपून भेटी-गाठी करायच्या आहेत, अंधारात ठेवायचं आहे, असं मला नाही वाटत. जोपर्यंत ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आघाडीतील एक जबाबदार आणि महत्त्वाचा घटकपक्ष म्हणून याबाबतीत आम्ही घाईघाईने निष्कर्ष काढणे आणि बोलणे योग्य ठरणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
हे सुद्धा वाचा
कुरुलकरला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द- नाना पटोले यांचा आरोप
राजद्रोहाचा कायदा रद्द होणार; केंद्राने इंग्रजांच्या काळातले कायदे रद्द केले
शहा यांनी गोंजारताच अजित पवार लागले कामाला; एकाच दिवसात घेतल्या दोन मॅरेथॉन बैठका
शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीबाबत संजय शिरसाट म्हणाले, ‘दोन्ही गटातील कार्यकर्ते टोकाची भूमिका घेणार नाहीत. वरिष्ठांच्या आदेशानंतर एकत्र काम करावे लागणार असल्याची कल्पना कार्यकर्त्यांना आहे. हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाहीतर शरद पवारांचा पक्ष आहे. त्यामुळे काहीही घडू शकते.’ २०२४ साली पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना शरद पवार पाठींबा देऊ शकतात? असे विचारल्यावर संजय शिरसाट यांनी म्हटलं, ‘नक्कीच २०२४ साली शरद पवार पाठींबा देऊ शकतात. शरद पवारांनी ‘लोक माझे सांगती’ पुस्तकात लिहिलंय की, ‘मुख्यमंत्री अडीच वर्ष मंत्रालयात येत नाहीत.’ तेव्हाच रोख स्पष्ट होतो की, उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत शरद पवारांना आवडली नाही.’