34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीच्या सोनिया दुहन यांनी घेतली सत्यपाल मलिक यांची भेट

राष्ट्रवादीच्या सोनिया दुहन यांनी घेतली सत्यपाल मलिक यांची भेट

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांनी आज जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीमध्ये पुलवामा हल्याबाबत गंभीर विधान केले होते. त्यानंतर सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्यांवर कथित विमा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने छापेमारी केली होती. या पार्श्वभूमीवर सोनिया दुहन यांनी सत्यपाल मलिक यांची भेट घेत आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुलाखत दिली होती. ही मुलाखत स्फोटक ठरली. या मुलाखतीमध्ये पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी गौप्यस्फोट करत सरकारच्या निष्क्रियतेमुळे हा हल्ला झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर चर्चांचे वादळ उठले. दरम्यानच्या काळात सत्यपाल मलिक यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांवर कथित विमा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने छापेमारी केल्याने विरोधी पक्षातील अनेक नेते सत्यपाल मलिक यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.


सोनिया दुहन यांनी देखील आज सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले असून त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माजी राज्यपाल सत्यपाल मलिकजी यांच्यासोबत आज त्यांच्या निवास्थानी भेट घेत, त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या सहकाऱ्यांवर सीबीआयने केलेली छापेमारी ही सरकारची अतिशय निंदनीय कृती आहे. पुलवामा हल्ल्यावर भाजपचा तिळपापड झाला आहे. आम्ही सत्यपाल मलिक यांच्यासोबत आहोत.

हे सुद्धा वाचा

IPS : मोदी सरकारचा दिल्लीत रडीचा डाव; केजरीवाल आव्हान देणार

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. संजीव सोनवणे; प्रा. हरे राम त्रिपाठी संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या ‘या’ फोटोची सोशल मीडियात चर्चा

सोनिया दुहन या हरियाणा राज्यातील हिसार येथील रहिवासी आहेत. वयाच्या २१ व्या वर्षापासून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करत आहेत. सन 2019 साली पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादीचे नॉट रिचेबल झालेल्या आमदारांना शोधून परत आणण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भेटण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. नुकतेच शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांन त्यांना राजीनामा देऊ नये अशी विनंती केल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा मागे घेतला. या पत्रकार परिषदेत पवारांच्या पाठीमागे त्या बसलेल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्या नावाची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये होती.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी