31 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeराजकीयभाजप व शिंदे गटात होणारी हाणामारी पाहायला विसरू नका; आमदार अमोल मिटकरी...

भाजप व शिंदे गटात होणारी हाणामारी पाहायला विसरू नका; आमदार अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळविस्ताराची चर्चा देखील होऊ लागली आहे. शिंदे-फडवणीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, भाजप व शिंदे गटात होणारी हाणामारी पाहायला विसरू नका !! भाग दोन लवकरच.. असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी करुन राज्यात सरकार स्थापन केले. इतकेच नव्हे तर पक्षावर देखील त्यांनी आपला दावा सांगितला. या सत्तासंघर्षाचे प्रकरण गेले 11 महिने सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. आज त्यावर घटनापीठाने निकाल दिला. या निकालात शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाल्यामुळे भाजप आणि शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा देखील सुरु झाली आहे.


गेले कित्तेक महिने मंत्रिमडळ विस्तार रखडला असून अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता होती. शिंदे गटासोबत गेलेले आमदार नाराज असल्याच्या चर्चा देखील होत होत्या. आता या सगळ्याला विराम बसणार असून मंत्रिमंडळ विस्तारातील अडथळा दूर झाल्याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका देखील काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे अनेक आमदार मंत्रिपद, महामंडळाची अध्यक्षपद मिळेल या आशेवर आहेत.

हे सुद्धा वाचा

दिल्लीला दिलासा; महाराष्ट्राची निराशा!

विद्यार्थ्यांच्या आधारसाठी शिक्षकांचा ‘प्रशासकीय’ छळ!

IAS : सुप्रीम कोर्टात केजरीवाल जिंकले; यापुढे नोकरशहांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण!

यावरुनच आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणीस सरकारवर निशाना साधला आहे. भाजप, शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपद मिळेल ही आशा आहे. अशातच मंत्रिपदासाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये वादविवाद होण्याची चिन्हे असल्याचेच मिटकरी यांनी ट्विटमधून सुचित केले आहे. गेले काही महिने राज्याच्या राजकारणातील संघर्षाचा एक वाद संपला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरुन आता भाग दोन सुरु होणार असल्याचे त्यांनी सुचित करत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी