28 C
Mumbai
Wednesday, September 27, 2023
घरराजकीयलोकसभा निवडणूक भाजपला जड जाणार; एकनाथ शिंदे, अजित पवारांना धक्का देणारा सर्वे

लोकसभा निवडणूक भाजपला जड जाणार; एकनाथ शिंदे, अजित पवारांना धक्का देणारा सर्वे

लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली असून भाजपसह सत्ताधारी पक्षांची एनडीए (NDA) आणि काँग्रेससह विरोधी पक्षांची इंडिया (INDIA) आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला गेल्या दोन निवडणुकांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार निवडून जातात. भाजप येथे किमान 40 खासदार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असताना ओपीनियन पोलमध्ये मात्र त्याच्या उलट चित्र दिसून येत आहे. आज इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्वेतून भाजपला ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

सन 2019 मध्ये स्थापन झालेले मविआ सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. मात्र त्यानंतर शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाकडे लोकांचा कल असल्याचे सर्वे दिसून आले. त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड करुन शिंदे-फडवणीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे हे ट्रिपल इंजिन सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र एवढी गोळाबेरीज करुन देखील आजच्या इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या सर्वेतून भाजपला महाराष्ट्रातून निराशाजनक स्थिती दिसून येत आहे.

सर्वेतून पुढे आलेल्या माहितीनुसार राज्यात भाजप- शिंदे गट- अजित पवार गट यांच्यासह महायुतीला केवळ २४ जागांवरच विजयी होता येईल असे दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (काँग्रेस, शरद पवार गट- उद्धव ठाकरे गट) यांना देखील २४ जागांवर विजयी होता येईल असे सर्वेतून दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेनेतील फुट होऊन देखील त्याचा मोठा फायदा भाजपला होताना दिसून येत नाही.

हे सुद्धा वाचा 

‘आरपीएफ’च्या व्हॉट्सॲप ग्रुपने महिला प्रवाशांचा प्रवास झाला सुरक्षित

फडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का?, भिडेविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश

रस्त्याची कामे निकृष्ट झाल्यास, कंत्राटदार, अधिकाऱ्यावर कारवाई करा – मुख्यमंत्री शिंदे

इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या सर्वेतून काय समोर आले?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ?
भारतीय जनता पार्टी – 20
राष्ट्रीय काँग्रस पक्ष – 9
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 11
राष्ट्रवादी (शरद पवार) – 4 
शिवसेना (शिंदे गट) 2
राष्ट्रवादी (अजित पवार) – 2 

महाराष्ट्रात विभागवार कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील ?

मुंबई विभाग
एनडीए- 4
इंडिया – 2

ठाणे आणि कोकण विभाग
एनडीए- 5
इंडिया -2

पश्चिम महाराष्ट्र
एनडीए- 5
इंडिया 6

उत्तर महाराष्ट्र
एनडीए – 3
इंडिया – 3

विदर्भ
एनडीए – 5
इंडिया 5

मराठवाडा
एनडीए – 2
इंडिया – 6

NDA vs INDIA Upcoming Lok Sabha Election Maharashtra Opinion Poll

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी