33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयराज्यपालांना कोल्हापूरचा जोडा दाखविण्याची गरज : उद्धव ठाकरे

राज्यपालांना कोल्हापूरचा जोडा दाखविण्याची गरज : उद्धव ठाकरे

टीम लय भारी

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. राज्यपालांवर राजकीय पुढाऱ्यांसोबतच नागरिकांकडून सुद्धा राग व्यक्त करण्यात येत आहे. राज्यपालांनी मुंबईकरांची माफी मागावी, असे देखील आता सांगण्यात येत आहे. राज्यपालांनी अंधेरी येथील एका कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये गुजराती आणि मारवाडी यांच्यामुळे पैसे आहेत, मुंबईला आर्थिक राजधानी अशी ओळख गुजराती आणि मारवाडी लोकांमुळे असल्याचे बोलले आहे.

परिणामी, त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी शिंदे गटाकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्यपालांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यपालांना आता घरी पाठवायचे की तुरुंगात असा प्रश्न उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राज्यपाल हे राज्याचे उच्च पद आहे. पण या पदावर असलेली व्यक्ती महाराष्ट्रात राहूनच मराठी माणसाचा अपमान करत आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम राज्यपाल करत आहेत. राज्यपालांनी दोन ते तीन वर्षात महाराष्ट्रातील सुंदर लेण्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले व महाराष्ट्रातील इतर सुंदर गोष्टी पाहिल्या असतील, पण आता त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर शब्दांचा हल्ला चढवला आहे. आता या कोल्हापुरी जोड्यांचा अर्थ ज्याला जसा काढायचा आहे तसा त्यांनी काढावा, पण आता खरंच राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल या पदाची आणि त्यांच्या खुर्चीची शान ठेवली नाही. महाराष्ट्रात राहून मराठीशी नमकहरामी करणे कितपत योग्य आहे ? पण यावेळी उद्धव ठाकरे राज्यपाल कोश्यारी यांचे आभार सुद्धा आभार मानले. कारण भगतसिंग कोश्यारी यांच्यामुळे दिल्लीकरांचा हेतू स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांचा जीव मुंबईतील पैशांमध्ये अडकला असल्याचे राज्यपालांच्या वक्तव्यातून जाणवून येत असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा :

‘मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

जयंत पाटलांनी राज्यपालांना दुसऱ्या राज्यात जाऊन राहण्याचा दिला सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी