28 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरराजकीयआमदार अपात्रतेसंदर्भात २६ ऑक्टोबरला सुनावणी

आमदार अपात्रतेसंदर्भात २६ ऑक्टोबरला सुनावणी

आमदार अपात्रतेप्रकरणी आता पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील आजची सुनावणी संपली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना त्यांची मते मांडण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली. त्यामुळे पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आली. वेगवेगळ्या ३४ याचिका यापुढे ६ याचिकेत मांडल्या जातील. त्यातच ठाकरे गटाच्या वकिलाकडून आज पुन्हा नवा अर्ज करण्यात आला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक सुनावणीत नवे अर्ज आल्यास सुनावणी लांबत जाईल, अशी नाराजी नार्वेकरांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयातील याचिका पूर्णपणे वेगळी आहे. हे लवाद असून इथे ट्रायल होते, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

आज विधानसभा राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये एकत्रित असे सहा गट तयार करण्यात आले. यामध्ये एकूण ३४ याचिका आहेत. याच ३४ याचिकांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ते १६ ठाकरे गटाच्या याचिका असतील.

ठाकरे गटाकडून वकील सनी जैन उपस्थित होते. आजची सुनावणी याचिका एकत्रित करण्यासाठी होती. सर्व ३४ याचिका  सहा याचिकांमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.  एक ते १६ या ठाकरे गटाच्या याचिका आहेत. याचिका क्रमांक १७ ठाकरे गटाकडून अपक्ष आमदारांविरोधात दाखल केल्या आहेत. आज अर्ज करताना आम्ही कुठल्याही प्रकारे वेळ वाढवून घेत नाही. फक्त अर्ज दाखल केला आहे. आम्हाला कागदपत्र रेकॉर्डवर आणायचे आहेत. त्यासाठी आमच्या गटाकडून समोरच्या आमदारांना २ जुलैरोजी व्हीप देण्यात आला होता. वेळापत्रक संदर्भात आम्ही आक्षेप घेतला आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्देश देईल, असे ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी सांगितले.
हे ही वाचा
प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचे वकील प्रवीण टेंबेकर यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. २६ ऑक्टोबरनंतर प्रकरण निश्चित होईल आणि नंतर सुनावलीला सुरुवात होणार.
राज्यातील आमदार अपात्रतेप्रकरणी राज्यातील वातावरण तापले आहे. विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण वेगाने हातावेगळे करावे, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. आणि याच मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन वेळा झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी