31 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरराजकीयNilesh Rane : उरलेले फक्त चटई, खुर्च्या उचला... निलेश राणेंकडून शिवसैनिकांसाठी सूचक...

Nilesh Rane : उरलेले फक्त चटई, खुर्च्या उचला… निलेश राणेंकडून शिवसैनिकांसाठी सूचक वक्तव्य

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागणार असून त्यांचा धाकटा भाऊ तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्याकडे युवासेनेची धुरा येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहेत. त्यावर निलेश राणे यांनी चांगलीच टीका केली आहे.

शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर युवासेनेत सुद्धा गळती सुरू झाली, त्यामुळे पक्षाच्या गोटातील हालचालींना आता कमालीचा वेग आला आहे. शिवसेनेतील फेरबदलांनंतर आता युवासेनेत सुद्धा नवनियुक्ती सुरू झाल्या आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागणार असून त्यांचा धाकटा भाऊ तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्याकडे युवासेनेची धुरा येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहेत. प्राण्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे शिवसेनेत सक्रीय होणार हे शिवसैनिकांसाठी औत्सुक्याचे ठरणार असले तरीही संपुर्ण घडामोडींवर मात्र भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

ठाकरे आणि राणे याचे राजकीय वैर अवघ्या राज्याला चांगलेच माहित आहे. ठाकरेंबाबत काहीही घडलेले असो राणेंकडून आवर्जून टीका – टिप्पणी पाहायला मिळते. यावेळी सुद्धा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही मुलांना लक्ष करीत शिवसेना, युवासेनेतील नियुक्त्यांवर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सोशल मीडियावर मत व्यक्त करत त्यांनी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

Dattatray Bharne : माजी मंत्री दत्तत्रय भरणे गोरगरीबांसाठी बनले आरोग्यदूत !

राहूल गांधींचा करारी बाणा, नरेंद्र मोदींची केली चिरफाड

VIDEO : भविष्यातील जनउद्रेकाची नांदी, तरूण घुसला ईडीच्या दारी !

ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, उरलेले फक्त चटई, खुर्च्या उचला… ठाकरेंना बाहेरचा चालत नाही. व्यक्ती कितीही शेंबडा असला तरी आडनाव ठाकरे असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, असे म्हणून त्यांनी सामान्य शिवसैनिकांना डिवचले आहे. फुटीच्या राजकारणानंतर शिवसेनेतील महत्त्वपूर्ण घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे, त्यामुळे अनेक टिका – टिप्पणींनंतर सुद्धा शिवसेनेची यापुढे वाटचाल कशी असणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी षण्मुखानंद हॉलमध्ये कुटुंबीयांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. युवासेनेत नवचैतन्य संचारण्यासाठी तेजस ठाकरेंची राजकारणीतील एंट्री आता महत्त्वाचा मानली जात आहे. परंतु याचवेळी सत्ताधारी शिवसेनेवर तुटून पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी