29 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराजकीय...म्हणून उद्धव ठाकरे आणि बारक्या टेबल टेनिस खेळण्यापुरतेच शिल्लक राहिलेत, राणेंचा ठाकरेंवर...

…म्हणून उद्धव ठाकरे आणि बारक्या टेबल टेनिस खेळण्यापुरतेच शिल्लक राहिलेत, राणेंचा ठाकरेंवर वार

टीम लय भारी

कणकवली : राणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी हल्ला चढवला होता आणि आता भाजप नेते निलेश राणे यांनी ‘शिवसेना पीआर व्हिडिओ’ म्हणून एक व्हिडिओ पोस्ट करीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले आहे, त्यामुळे या वादाला आणखी नवे तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निलेश राणे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष करीत सोशल मिडीयावर जोरदार टीका केली आहे. ट्वीटमध्ये राणे लिहितात, “PR चे नको ते उद्योग करत राहिले म्हणून उद्धव ठाकरे आणि बारक्या टेबल टेनिस खेळण्या पुरतेच शिल्लक राहिलेत,” असं म्हणून त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये एकजण गावकऱ्यांना हातात माईक देत ‘उद्धवसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत’, असं सारखं सारखं म्हणायला लावत त्यांचा व्हिडिओ शूट करण्यात येत असल्याचे दिसत आहे. हाच व्हिडिओ पोस्ट करीत निलेश राणे यांनी ठाकरेंना सुनावले आहे.

हे सुद्धा वाचा…

शिंदे गट – भाजपचे अखेर ठरले! आगामी निवडणुकीत ‘या’ महापालिकेसाठी करणार युती

‘गुड बाय..’चा मॅसेज करत महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

मोदी सरकारच्या काळात ईडीचे फावले? अर्थमंत्र्यांकडून ‘हे’ स्पष्टीकरण

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!