27 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरराजकीयNilesh Rane : निलेश राणेंनी दीपक केसरकरांना देऊ केली वाहनचालकाची नोकरी!

Nilesh Rane : निलेश राणेंनी दीपक केसरकरांना देऊ केली वाहनचालकाची नोकरी!

दीपक केसरकर तुम्ही लायकीत राहायला शिका, तुमची लायकी काय आहे, हे मागच्यावेळी सांगितलं होतं. आता त्याबद्दल काही बोलणार नाही. पण नख लावला तर तुम्हाला फाडून टाकणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या भानगडीत पडू नका असे म्हणून राणे यांनी दीपक केसरकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले आणि राज्यातील राजकारणाच्या वादाला नवे तोंड फुटले. एकमेकांवर टीकांचे बोचरे बाण सोडून सत्ताधारी – विरोधक जनतेसमोर त्यांचेच हसे करून घेत आहेत. दरम्यान आता राणे कुटुंबिय आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यातील वादला तोंड फुटले आहे, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. दीपक केसरकर यांनी नुकतंच माध्यमांशी संवाद साधत राणे कुटुंबियांसोबत आमचा वयक्तिक वाद नसून त्यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते, त्यावर मैत्रीचा हात पुढे करण्याऐवजी आक्रमक भूमिका घेत निलेश राणे यांनी केसरकरांवर सणसणीत टीका केली आहे.

याबाबत राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निलेश राणे ट्वविटमध्ये म्हणतात, दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे असे म्हणून त्यांनी दीपक केसरकरांची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान याबाबत निलेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ सुद्धा जारी केला आहे. यामध्ये राणे म्हणतात, दीपक केसरकर आमच्यासोबत काम करायला तयार आहेत, म्हणजे आम्ही त्यांना थांबवत होतो की काय? दीपक केसरकर कधी येणार आणि आमच्यासोबत ते कधी काम करणार… ते स्वत: ला खूपच महत्त्व देत आहेत. एवढं महत्त्व त्यांचं कधीच नव्हतं. आता तेही शिल्लक राहिलेलं नाही, असे म्हणून दीपक केसरकरांवर त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : ‘प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो’

Manisha Kayande : भंडारा बलात्कार पीडितेची आमदार मनिषा कायंदे यांनी घेतली भेट

Breaking : हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

निलेश राणे पुढे म्हणतात, दीपक केसरकर यांनी स्वत:ची लायकी आधी ओळखून घ्यावी. मला तर वाटतंय त्यांना कसलातरी मानसिक रोग झाला आहे. ते कधी ठाकरे कुटुंबाबाबत चांगलं बोलतात, तर दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्याविरोधात काहीतरी बोलतात. त्यांचा वरचा मजला रिकामा झाला आहे किंवा काहीतरी गडबड झाली आहे. दीपक केसरकर तुम्ही लायकीत राहायला शिका, तुमची लायकी काय आहे, हे मागच्यावेळी सांगितलं होतं. आता त्याबद्दल काही बोलणार नाही. पण नख लावला तर तुम्हाला फाडून टाकणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या भानगडीत पडू नका असे म्हणून राणे यांनी दीपक केसरकर यांना धारेवर धरले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी