26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकीयनितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

टीम लय भारी

मुंबई : राणे कुटुंबियांकडून कायमच ठाकरे कुटुंबियांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येतात. कधी आमदार नितेश राणे(Nitesh Rane) तर कधी त्यांचे बंधू निलेश राणे हे ट्विटरच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागत असतात. पण आता आमदार नितेश राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक (Nitesh Rane sensational accusation against Uddhav Thackeray) आरोप करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती, असा आरोप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. शुक्रवारी सेनेचे आमदार सुहास कांदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांची सुरक्षा मुद्दाम काढून घेण्यात आली असे गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, यानंतर नितेश राणे यांनी सुद्धा पुढे येत त्यांचे वडील नारायण राणे यांना मारण्याची उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती, असे आरोप केले. आता म्याव..म्याव संपू द्यात, त्यानंतर व्याजासकट ‘वस्त्रहरण’ करण्यात येईल, असेही नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करण्यात येत आहेत.

सध्या राज्यभरात आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रा घेण्यात येत आहे. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. तर या निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील आमदारांना आव्हाने देण्यात येत आहेत. ज्यामुळे राज्यात उद्धव ठाकरे शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यात कायमच शाब्दिक वार पाहायला मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा :

शिंदे-फडणवीस सरकारने ‘डिसले गुरुजीं’चा राजीनामा नामंजूर केला

संजय मंडलिकांच्या निर्णयावर सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी

निष्ठा यात्रेनंतर शिवसेनेला भिवंडीत बसला धक्का

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!