28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनितीन गडकरी खूपच चांगला माणूस, पण... अशोक चव्हाणांची खंत...

नितीन गडकरी खूपच चांगला माणूस, पण… अशोक चव्हाणांची खंत…

टीम लय भारी

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे अनेकजण नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे सोशल मीडियावरून उघडपणे सांगत आहेत. तसेच सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. कोरोना काळातील कामगिरीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये कौतुकाचा वर्षाव होत असलेले भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची आता काँग्रेसकडूनही प्रशंसा करण्यात आली आहे.

केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणजे ‘चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे मत काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विखे-पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

सोशल मीडियावर निर्बंध, लोकांना तुरुंगात टाकण्याचा केंद्राचा डाव; थेट मोदींवर आरोप…

Nitin Gadkari Right Man in Wrong Party: Maha Minister Ashok Chavan

रविवारी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. नितीन गडकरी (Nitin Gadkari) रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत. परंतु केंद्र सरकारकडून त्यांची कोंडी केली जाते. त्यांच्याकडून अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहेत, असा आरोपही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला.

यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही मोदी सरकारने कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यात हातात सोपवावीत, असे म्हटले होते. पंतप्रधान कार्यालय हे कुचकामी आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) देशातील कोरोनाची परिस्थिती योग्यप्रकारे हाताळलीत, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सुचविले होते.

‘गडकरीसाहेब म्हणाले, विदर्भातील ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा’

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा जाणवत असताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात ठाण मांडून सूत्रे हाताळली होती. त्यांनी विदर्भासासाठी ऑक्सिजन आणण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, विदर्भातले ऑक्सिजन पुरवठ्याचे आम्ही बघतो, बाकीचे तुम्ही बघा, असे वेगवेगळ्या भागातले नियोजन वाढले तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही.

‘मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री’

मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा वरचा क्रमांक लागतो. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा प्रशासनावर असणारा वचक आणि झपाट्याने काम उरकण्याची क्षमता या दोन्ही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय, उपजत असलेल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना अनेक विषयांचे ज्ञान आहे. इंधननिर्मितीसाठी इथेनॉलचा प्रभावीपणे वापर असो किंवा महामार्ग प्रकल्पांचे वेगाने काम करण्याची हातोटी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी