30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
HomeराजकीयNitin Gadkari : नितीन गडकरींनी केले पुन्हा एकदा सूचक वक्तव्य

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी केले पुन्हा एकदा सूचक वक्तव्य

एखादा व्यक्ती पराभूत झाला म्हणजे तो संपत नाही. तसेच जो हार मानतो, तो संपत नाही. नितीन गडकरींनी नागपूरमध्ये उदयोजकांच्या बैठकीमध्ये बोलतांना हे स्पष्ट केले.

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या सडेतोड भूमीकेसाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय जनता पक्षाला शिखरावर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी राजकारण सोडण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. त्यांना पुर्ण विराम देण्यासाठी नितीन गडकरींनी अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्या आत्मकथेमधील एक किस्सा सांगितला. एखादा व्यक्ती पराभूत झाला म्हणजे तो संपत नाही. तसेच जो हार मानतो, तो संपत नाही. नितीन गडकरींनी नागपूरमध्ये उदयोजकांच्या बैठकीमध्ये बोलतांना हे स्पष्ट केले.

त्यावेळी ते असेही म्हणाले की, व्यवसाय करणारे तसेच समाज‍िक कार्य करणारे तसेच राजकारणी लोकांची ताकद मोठी असते. नितीन गडकरींना भाजपच्या संसदीय बोर्डावरुन हटवल्यानंतर त्यांच्या विषयी उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. ‘चांगले दिवस असो अथवा वाईट दिवस असो, एकदा कोणाचा हात पकडला तो कधी सोडायचा नसतो, उगवत्या सुर्याची पूजा कोणी करु नये, असे सूचक वक्तव्य यावेळी नितीन गडकरींनी केले.

गडकरींनी यावेळी त्यांच्या राजकारणातील दिवसांची आठवण करुन दिली. ते ज्यावेळी युवा नेता होते त्यावेळी काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकर त्यांना काँग्रेसमध्ये सामील करुन घेण्याचा प्रयत्न करीत होते. पंरतु मी श्रीकांत जिचकर यांना सांगितले की, विहीरीमध्ये उडी मारुन मरेन परंतु काँग्रेसमध्ये येणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा पसंत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानायला घाबरु नका. हार मानल्यामुळे माणूस संपत नाही.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : मोदींच्या ‘अच्छे दिन’वरून शरद पवार झाले आक्रमक

Sharad Pawar : ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज, शरद पवारांचा सूचक इशारा

Bhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गडकरी बोलले त्यानंतर त्यांना काही दिवसांमध्येच भाजपने संसदीय बोर्डवरुन हटवले. त्यांना या पदावरुन हटव‍िण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील संमती होती. त्यापूर्वी ते नागपूरमधील एका समारंभात बोलत होते. कधी कधी मी राजनिती सोडण्याचा विचार करतो. जीवनामध्ये अनेक आशा गोष्टी करण्यासारख्या आहेत. भाजपच्या नवीन संसदीय बोर्डामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे. आशा प्रकारे भाजपचे सम‍िकरण बदलेले आहे.

गडकरी असेही म्हणाले होते की, जेंव्हा आपल्याला सफलता मिळते त्यावेळी त्याचा आनंद आपल्या एकटयाला व्हायला नको. तसेच आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, अहंकार आण‍ि आत्मव‍िश्वास यामध्ये फरक आहे. कोणालाही वापरुन फेकून देतात या शर्यतीमध्ये सामील नाही झाले पाहिजे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी