29 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरराजकीयनितीन गडकरी यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी

नितीन गडकरी यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याच्या धमकीचे (Death threat) फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरातील त्यांच्या कार्यालयता तीन फोन आले, त्यात खंडणीची मागणी करत गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून सायबर सेलने देखील तातडीने या घटनेचा तपास सुरू केला आहे. (Nitin Gadkari to over phone Death threat)

मिळालेल्या मिहितीनुसार या फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊद असा नावाचा उल्लेख करत, गडकरी यांच्याकडे खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील संबंधीत व्यक्तीने दिली आहे. नितीन गडकरी यांचे नागपुरातील खामला परिसरात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास धमकीचा पहिला फोन आला, त्यानंतर ११. ३२ आणि त्यांनतर दुपारी १२.३२ वाजेच्या दरम्यान असे एकुन तीन फोन आले.

हे सुद्धा वाचा 

कामाची बातमी : घरमालकांना मोठा दिलासा अन् भाडेकरूंची कटकटीतून मुक्तता

Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !

एकनाथ शिंदे दावोसमध्ये जाऊन ठाकरेंवर करणार मात !

अंडरलवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा फोन?
मंत्री नितीन गडकरी यांना आलेला धमकीचा फोन अंडरलवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा असल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्याचा देखली तपास पोलीस करत आहेत. दरम्यान हा फोन कर्नाटकातू आल्याचे देखील सांगितले जात आहे. गुन्हे शाखा सीडीआरचा तपास करत असून नेमका फोन कुठून आला याचा शोध घेतला जात आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी