22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरराजकीयNitin Raut : पोलिसांची दंडेली! माजी मंत्री नितीन राऊत यांना मोठी दुखापत

Nitin Raut : पोलिसांची दंडेली! माजी मंत्री नितीन राऊत यांना मोठी दुखापत

तेलंगणातील या यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यासोबत दुर्देवी प्रसंग घडला असून यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

सध्या देशभरात काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची प्रचंड चर्चा होत आहे. मोठा जनसहभाग असलेली ही यात्रा अनेकांसाठी आता उत्सुकतेचा विषय ठरू लागली आहे. दरम्यान काही दिवसांमध्ये ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. तत्पुर्वी ही भारत जोडो यात्रा तेलंगणात पोहोचली असून तेथील नागरिकांमध्ये एक कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. तेलंगणातील या यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यासोबत दुर्देवी प्रसंग घडला असून यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उत्सवाच्या उत्साहावर निश्चितच आता मोठा प्रश्नचिन्ह उमटला आहे. राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने ढकल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हैदराबाद येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेत राऊत राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. या यात्रेदरम्यान काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळली. या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस सुद्धा आटोकाट प्रयत्न करत होते परंतु त्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागत होते. तरीसुद्धा पोलिस लोकांना राहुल गांधींपासून दूर सारत होते. याचवेळी तेलंगणाच्या एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरदार धक्का देत त्यांना ढकलले. या सगळ्या गोंधळात राऊत खाली कोसळले यामध्ये त्यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली.

हे सुद्धा वाचा…

Monsoon Alert : थंडीत पावसाचा दणका! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

Tomato Prices : ‘टोमॅटो’ने शेतकऱ्यांना रडवलं; दर कमालीचे कोसळले

Nana Patole : ‘एकनाथ शिंदेंचं असंवेदनशील सरकार बरखास्त केलं पाहिजे’ शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना नाना पटोले आक्रमक

पोलिसाचा धक्का जोरात लागल्याने नितीन राऊत जमिनीवर कोसळले. त्यावेळी त्यांचं डोकं जमिनीवर आपटणार तेवढ्यात ते वाचवण्यासाठी त्यांनी त्यांचा हात पटकन डोक्याभोवती धरला, मात्र या कसरतीत त्यांच्या चेहऱ्याला मार लागला. यामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याला मोठा मार लागला असून त्यांच्या डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेला आहे. त्यांचा डोळा यामध्ये अक्षरश: काळानिळा पडला असून हातापायाला सुद्धा खरचटले आहे. यानंतर नितीन राऊत यांना हैदराबाद येथील बासेरी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे.

नितीन राऊत यांच्या या अपघातानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, के.सी. वेणुगोपाल, के. राजू यांच्यासह प्रमुख नेत्यांनी राऊत यांची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालय गाठले, तर राहुल गांधी यांनी सुद्धा नितीन राऊत यांची फोनवरून विचारपूस केली. सदर प्रकार मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आला असून राऊत यांच्यावर उपचार सुरू आहे. राऊत यांची डाॅक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा डोळा आणि कानाच्या मधील भागात फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या नितीन राऊत यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!