28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयब्राम्हणेतर व्यक्तीला उमेदवारी दिली, आता भोगा परिणाम ! हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचा...

ब्राम्हणेतर व्यक्तीला उमेदवारी दिली, आता भोगा परिणाम ! हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचा भाजपला थेट इशारा

पुण्यातील कसबा आणि पिंपरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी ब्राह्मणेतर समाजातील व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी घोषित केल्याने हिंदू महासंघात पोटशूळ उठला आहे. भाजपला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराच हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी दिला आहे. भाजपाने पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित केल्यानंतर पुण्यातील ब्राह्मण समाजात अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातही मेधा कुलकर्णी यांना उमदेवार न देता चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्याचा संदर्भ देत दवे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Nomination to non-Brahmi, Hindu Mahasangh warned to BJP)

पिंपरीचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. मात्र, या मतदारसंघात मुक्त टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना संधी देण्यात आल्यामुळे कसब्यातील ब्राह्मण समाजात प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले असल्याचे बोललं जात आहे. आनंद दवे यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली असून ब्राम्हण समाजाच्या नाराजीच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.

Nomination to non-Brahmi, Hindu Mahasangh warned to BJP Brahmins, Hindu Mahasang, BJP

 

‘अच्छे दिन’ आल्यावर भाजप ब्राह्मणांना विसरला
आनंद दवे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ब्राम्हणांनी भाजपच्या पडत्या काळात सर्वाधिक काम केले. भाजपची ज्यावेळी ओळखही निर्माण झाली नव्हती. अस्तित्वासाठी झटत होता त्यावेळी ब्राम्हण समाजाने सर्वाधिक काम केले. मग आता भाजपाला चांगले दिवस आल्यानंतर ब्राम्हण समाजाला का डावलण्यात येत आहे? असा संतप्त सवाल दवे यांनी विचारला आहे. ते पुढे म्हणाले, “ब्राह्मण समाजाचाच उमेदवार असावा असा अट्टाहास आमचा कधीच नाही.
पण लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांना जो न्याय लावण्यात आला तोच न्याय टिळकांच्या कुटुंबियांनाही लावायचा होता. विधानसभेत, लोकसभेत प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व मिळावे, अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे.”

हिंदू महासंघ स्वतःचा उमेदवार उभा करणार
टिळक कुटुंबातील व्यक्तीला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी न दिल्याने पुण्यातील ब्राम्हण समाज नाराज झाला आहे. समाजमाध्यमांवर भाजपचेच काही लोक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. याचे परिणाम २-३ तारखेला पाहायला मिळतील. आम्ही एक तर स्वत: उमेदवार उभा करू किंवा तटस्थ राहू, असे वक्तव्य आनंद दवे यांनी केले आहे. या नवीन घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; अजित पवार यांचे खास ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू साथीदार!

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, शंकरराव गडाख यांना पुन्हा ‘जीव मुठीत घेऊन’ पवित्र सभागृहात यावे लागणार…

लक्ष्मण जगताप यांच्या आजारपणातच भाजपने रचले होते आमदारकीच्या निवडणुकीचे कारस्थान, राष्ट्रवादी नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी