32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयशिवसेनेतील सत्ता संघर्षाचा ’गुंता‘ अधिक वाढणार?

शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा ’गुंता‘ अधिक वाढणार?

टीम लय भारी

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. आज सर्वोच्च न्यायालयात शिंदेगट विरुध्द शिवसेना सत्ता संघर्षावर सुनावणी झाली. मात्र हा सत्ता संघर्षाचा पेच सुटला नाही. आता पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे. तर 29 जुलैपर्यंत दोन्ही पक्षांना प्रतिज्ञा पत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्रिस्तरीय खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यामुळे शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा ’गुंता‘ अधिक वाढणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आजच्या सुनावणीमध्ये शिवसेनेच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. एकनाथ शिंदे पक्ष प्रमुखासारखे कसे काय वागु शकतात? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी केला. आमदार आहे म्हणून ठरवेल असे होणार नाही. एखादया सभागृहाचे तुम्ही सदस्य आहात. तुम्ही घेतलेला निर्णय हा सभागृहात न घेता दूर जावून घेतला. एकनाथ शिंदे हे गटनेता आहेत हे बरोबर आहे. मात्र पक्षप्रमुख अजूनही उध्दव ठाकरे हेच आहेत. व्हिप नेमणे हा पक्षाचा अधिकार आहे. असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

तर शिंदेगटाकडून हरिश साळवे यांनी युक्तीवाद केला. पक्षाला दुसरा नेता हवा असेल, तर त्यात चुक काय? पक्ष सोडून दुस-या गटात सामील होणे ही बंडखोरी कशी होऊ शकतो? शिंदे गटाने पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होतो? त्यांनी व्हिपचे उल्लंघन केले नाही? 20 आमदारांचा पाठिंबा नसलेला नेता मुख्यमंत्री पदी कसा राहू शकतो? जे आमदार सभागृहात निवडून गेले ते आमदार गटनेता निवडू शकतात. तर अभिषेक मनु संघवी यांनी शिवसेनेकडून युक्तीवाद केला.

गटनेता हटवणे हा पक्षाचा अधिकार आहे. शिंदेगटातील आमदारांनी व्हिपचे उल्लंघन करत बैठकीला दांडी मारली. विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठराव प्रकरणी आज सुनावणी झाली नाही. तर पुढील सुनावणी पर्यंत परिस्थिती ‘जैसे थेच‘ ठेवावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. मात्र खंडपीठाने त्यावर कोणतीच टिप्पणी केली नाही. कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली असून, गरज वाटल्यास हे प्रकरण मोठया खंडपीठाकडे वर्ग करु असे खंडपीठाने सांगितले. पुढील सुनावणीपर्यंत सर्व रेकाॅर्ड सुरक्षीत ठेवावे अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केली.

हे सुध्दा वाचा:

हिंदुत्वावर खेळी खेळणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी फटकारले

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

विदर्भात शिंदे गट शिवसेना फोडणार? ‘मिशन विदर्भ’ लवकरच सुरू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी