28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरराजकीयओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची छत्रपति संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची छत्रपति संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद

मराठा आरक्षणावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange-Patil) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याची सुनावणी केली. (१७ नोव्हेंबर) दिवशी त्यांनी सांगली जिल्ह्यातील विटा येथे मराठा समाजाला एकत्र येऊन आरक्षणाबाबत आवाहन केलं आहे. अशातच आता ओबीसी नेते ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. यासाठी एल्गार सभा घेत आहेत. अशातच (१७ नोव्हेंबर) दिवशी जरांगेंच्या अंबड तालुक्यात ओबीसी नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सभा घेतली आणि जरांगेंवर जोरदार हल्ला केला आहे. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात तालुक्यांत मराठा आरक्षणावर सभा घेण्यात येणार आहेत. या पाठोपाठ छत्रपति संभाजीनगर (Chatarapati sambhajinagar) येथे देखील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (prakash Shendage) यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ओबीसी जनमोर्चाच्या वतीने ओबीसी नेते आमदार प्रकाश शेंडगे, प्रा. टी. पी मुंडे. कुणबी समाज नेते चंद्रकांत बावकर आणि इतर ओबीसी नेते यांची पत्रकार परिषद छत्रपति संभाजीनगरमधील सुभेदार गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार आणि इतर नेते नेमके काय बोलतील? पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडतील? याकडे छत्रपति संभाजीनगर वासियांचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची छत्रपति संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद

‘भुजबळ मंत्री असून कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही’

‘नातवाला, पुतण्याला साखर कारखाणे दिले आणि मराठ्यांच्या हातात कोयते’

पत्रकार परिषदेची वेळ

अनेक दिवसांपासून मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला विरोध दर्शवत ओबीसी समाजाने मराठा समाजाविरोधात सभा घेत एल्गार पुकारला आहे. यावर आता छत्रपति संभाजीनगरमध्ये सुभेदार गेस्ट चौकात दुपारी १२.३० वाजता प्रकाश शेंडगे पत्रकार परिषद घेत आहेत. या सभेत शेंडगे काय बोलतील? कोणते मुद्दे मांडतील हे पाहणे उत्कंठावर्धक असेल.

ओबीसी समाजाच्या मागण्या –

मराठा समाजाला जी खोटी कुणबी प्रमाणपत्रं दिली आहेत ती रद्द करावी

ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश करु नका

बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी