26 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरराजकीयस्वाभिमानाचा एक्झीट केव्हाही बरा; पंकजा मुंडे यांनी क्लिअरच सांगितले

स्वाभिमानाचा एक्झीट केव्हाही बरा; पंकजा मुंडे यांनी क्लिअरच सांगितले

मी पहिल्यांदा आमदार झाले होते तेव्हा सुधीर गाडगीळ यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांच्या एका प्रश्नाला उत्तर दिले होते. ज्या गोष्टी बाळगून मी राजकारणात (politics) आले, त्या जर समाजासाठी समर्पित करण्याची मला मुभा नसेल तर, काँम्प्रमाईझचे राजकारण कऱणे मला शक्य होणार नाही, त्यामुळे हायवेवर प्रत्येक किलोमीटरवर एक एक्झीट असतो. स्वाभिमानाचा  (Self-esteem) एक्झीट कधीही बरा, बिना स्वाभिमानाच्या कळी आपल्या ताटात वाढून घेण्यापेक्षा राजकारणातून बाहेर पडण्याची भीती मला अजिबात वाटत नाही. कारण माझ्यासाठी ते खुपच क्लिअर आहे. आणि मी स्वत:ला कुठे पाहते, तर मी लोकांच्या नजरेत, स्वत:ला तिथे पाहते, जिथून कोणी मला खाली उतरवू शकणार नाही, असेच काम माझ्या कार्यकाळात व्हावे ही माझी इच्छा आहे. असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. (Pankaja Munde said it clearly Self-esteem exit anytime, well)

‘वी प्रोफेशनल्स’ या वंजारी समाजाच्या संस्थेमार्फत आयोजित विद्यार्थी परिषदेमध्ये एका मुलाखतीमध्ये माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तरे देत आपली राजकीय भूमिका मांडली. राजकारणातलं मॅनेजमेंट पाहिलं तर प्रत्येक दशकात मला वेगवेगळे राजकारण दिसत आहे. तो देखील एक लिहिण्याचा विषय असू शकतो. आताच्या राजकारणाचे मॅजमेंट फक्त राजकारण आहे, असे नाही राजकारण त्या पलिकडे आहे, असा विश्वास असणाऱ्यांपैकी मी एक आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, मीडिया मॅनेजमेंट करुन राजकारण स्थिरावेल हे म्हणणे आणि ते लोकांना पटणे याच्यातील गॅप आहे ते मॅनेजमेंट फार महत्त्वाचे आहे.

राकारणात दशकभराहून अधिक प्रवास झाला. राजकारणातून काय धडा मिळाला या प्रश्नावर त्या म्हणाल्या मला राजकारणाने किंवा जीवनातल्या प्रवासाने हा धडा नक्की दिला आहे की, जर तुम्ही स्पष्ट असाल, तुम्ही जे जगता तेच तुम्ही असाल तर तुमच्यापासून लोकांचे प्रेम आशिर्वाद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे तरुणांना हेच सांगेन हिमतीने स्वत:च्या पायावर उभे रहा, आलेल्या कुठल्याही वादळाला शरण जाऊ नका आणि त्यात वाहून जाऊ नका. स्वत:चा पाठीचा कणा नम्रपणे कुणाला साष्टांग दंडवत घालण्यासाठी जरुर वाका पण काही मिळविण्यासाठी वाकण्याची गरज नाही.

तुमच्या संयमाचे रहस्य काय आहे, की वादळापूर्वीची शांतता आहे ? या प्रश्नाल उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, संयम हा प्रत्येकाचा स्थायी भाव आहे. मिडीयाला, किंवा काही लोकांना वाटते पंकजा मुंडे उताविळ आहेत, त्यांच्याकडे संयम नाही. पण मला असे वाटते की, हे सगळं पचविण्यासाठी प्रचंड संयम लागतो. आणि तो माझ्याकडे अनुभवाने आला आहे. संयमासारखा दुसरा गुरू नाही. हा संयम माझ्याकडे आहे कारण मी स्त्री आहे. एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या घरी मी जाते तेव्हा लहान मुले असतात. आणि त्या घरातील स्त्री शुन्यात बघत असते तीला नाही वाटत विष प्यावे, फास लावून घ्यावा. तिच्या पदरात अनेक जबाबदाऱ्या असतात आणि त्या ती निभावत असते. मला वाटते. आपल्यात अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यांना नख लावू नये त्यालाच मी माझ्या जीवनातील संयम म्हणते. महाभारतातील भिष्म पितामह यांची भूमिका सध्या आपण वठवित आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

मोदीजी, फक्त गुजरातकडेच नाही इतर राज्यांकडेही लक्ष द्या!

अपघातवार! तीन भीषण अपघातात ६२ प्रवाशांचा मृत्यू

आता कार्यालयातही बिनधास्त झोपा!

३ जून २०१४ रोजी मी स्वत: ला गोपीनाथ मुंडे यांच्यात अर्पण केलेले आहे. त्यामुळे मला आता कळतय आता साहेब होणे फार कठीण आहे. खुप अपार कष्ट, प्रतारणा, संघर्ष, प्रेम मिळणे भाग्य आहे. ती पचविण्यासाठी शक्ती लागते. मुंडे साहेब होणे सोपे नाही, ताईसाहेब होणे देखील खुपच अवघड आहे, असे पंकजा मुंडे म्हणल्या. गोपीनाथ मुंडे यांचे नसणे खुपच जाणवते, त्यांनी आम्हाला, सेवा करण्याची संधी द्यायला हवी होती. त्यांनी ती संधी दिली नाही, साधा रक्ताचा एक थेंब देखील त्यांनी मागितला नाही. अख्ख आयुष्य त्यांनी लोकांसाठी दिले. त्यांना रक्त कमी पडले असते ना तर जगात विश्वविक्रम झाला असता. इतक्या लोकांनी स्वत:चे रक्त दिले असते. त्यांनी इतक्या लवकर जायला नाही पाहिजे होते, आमची प्रतिक्षा करायला हवी होती, असे देखील त्या भावनिकतेने म्हणाल्या.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी