26 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरराजकीयधनूभाऊंच्या भेटीला पंकजाताई ब्रिच कॅन्डी रुग्णालयात; आस्थेने केली तब्बेतीची विचारपूस

धनूभाऊंच्या भेटीला पंकजाताई ब्रिच कॅन्डी रुग्णालयात; आस्थेने केली तब्बेतीची विचारपूस

राजकारणात एकमेकांचे विरोधक असले तरी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बंधू-भगीनीचे जिव्हाळ्याचे नाते मात्र तेवढेच अतूट असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अनेकदा कौटुंबिक संकटाच्या वेळी असो वा कधी कोणत्या कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर हलके फुलके हास्यविनोदाचे प्रसंग असो, बीडकरांसह अख्या महाराष्ट्राला ते सुखावणारे क्षण असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर सध्या धनंजय मुंडे मुंबईतील ब्रिच कॅंन्डी रुग्णालयात (Brich Kandy Hospital) दाखल आहेत. बुधवारी सायंकाळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जावून भेट घेतली. या आधी देखील धनंजय मुडे आजारी असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.

गेल्या आठवड्यात परळीत धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. परळीत प्राथमिक उपचार करुन त्यानंतर त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची रुग्णालयात जावून तब्बेतीची विचारपूस केली होती. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील त्यांना रुग्णालयात जावून भेटले तसेच त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.

हे सुद्धा वाचा 

मुंबई ते उरण, पनवेल, अलिबाग प्रवास होणार सुसाट; शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड नोव्हेंबरपासून होणार खुला

कोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मोठी बातमी : अमेरिकेवर सायबर हल्ला, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण हवाई सेवा ठप्प!

दरम्यान आज सायंकाळी पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जावून भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्बेतीची अतिशय आस्थेने त्यांनी विचारपूस केली. तसेच काही वेळी धनंजय मुंडे यांच्याशी गप्पा देखील मारल्या. तसेच त्यांना तब्बेतीची काळजी घेण्याचा सल्ला देत काही कमी जास्ती लागले तर कळवं असे देखील त्यांनी धनंजय मुंडे यांना यावेळी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी