32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयपश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो!

पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो!

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी राजकारण काही थांबायच नाव घेत नाही. अपुऱ्या आरोग्य सुविधामुळे सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. आता कोरोना लस प्रमाणपत्रावरील फोटोचा वाद रंगला आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो दिसणार आहे (In West Bengal, a photo of Chief Minister Mamata Banerjee will appear on a corona vaccination certificate).  

कोरोना लस घेतल्यानंतर कोविन अ‍ॅपवरून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येत असल्याने भाजपाविरोधी राज्यांनी आक्षेप घेतला आहे. छत्तीसगडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांचा फोटो दिसणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावेळी १८-४४ वयोगटातील नागरिकांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांचा फोटो असणारे प्रमाणपत्र मिळणार आहे.

संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मुळे राजकीय वर्तुळात चर्चा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पूनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस : अशोक चव्हाण

Now, Mamata’s picture on vaccine certificates in West Bengal

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेप घेतला होता. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी केला होता. परंतु आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर लागणार असल्याने दोन्ही पक्षांमधील वाद आणखी वाढणार आहे.

भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप

भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तृणमूल काँग्रेस पंतप्रधानपदाचा मान ठेवत नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावू शकते तर आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांचा फोटो का लावू नये? असा प्रतिप्रश्न तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

लस तुटवड्यावरून साधला निशाणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. लसींच्या तुटवड्यावरुन त्यांनी केंद्र सरकारला चांगलेच सुनावले होते. राज्यांना लस उपलब्ध होत नसताना संपूर्ण देशाचे डिसेंबरपर्यंत लसीकरण कसे करणार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लस दिली पाहीजे असे ही सांगितले होते. “केंद्र सरकार खूप काही सांगते. पण तसे होत नाही. वचनबद्धता असली पाहीजे. लस संपूर्ण देशाला पुरवणे मोठे काम आहे. राज्यांना लस पुरवू शकत नाहीत. तर डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण कसे करणार?”, असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी उपस्थित केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी