34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशरद पवारांचे सरकार काँग्रसेने पाडले; राज्यसभेत मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

शरद पवारांचे सरकार काँग्रसेने पाडले; राज्यसभेत मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

राज्यसभेत (Rajya Sabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराच्या भाषणादरम्यान गुरुवारी (दि.९) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काँग्रसेवर कडाडून टीका केली.  मोदी यांनी काल लोकसभेत जोरदार भाषण करत विरोधकांवर टीका केल्यानंतर आज देखील त्यांनी राज्यसभेत काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रतिहल्ला केला. यावेळी मोदी यांनी शरद पवार (Sharad pawar) यांचा उल्लेख करत मी त्यांना आदरनीय मानतो, १९८० मध्ये त्यांचे सरकार काँग्रेसने पाडले, असे सांगत काँग्रेसने अनेक राज्यांतील सरकारे कशी पाडली याची देखील अनके उदाहरणे दिली. (PM Modi strongly criticizes Congress in Rajya Sabha)

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले, इंदिरा गांधी यांनी ५० वेळा कलम ३५६ चा वापर केला. त्यांनी ५० वेळा विविध राज्यांतील सरकारे पाडली. डाव्या पक्षाचे सरकार सर्वात आधी केरळमध्ये स्थापन झाले, पण नेहरूंना ते पसंत नव्हते काही दिवसांतच त्यांनी ते सरकार पाडले. तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांचे देखील सरकार काँग्रेसने बर्खास्त केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मोदी यांनी भाषणात शरद पवार यांचा भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले. या सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य मागे बसले आहेत. मी त्यांना आदरनीय मानतो, त्या नेत्याचे नाव शरद पवार… पवार यांचे वय ३० ते ४० असताना एक तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी निघाला होता. पण त्यांचे देखील सरकार काँग्रेसने पाडले. मात्र आज ते काँग्रेसच्या बाजूने असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले यांनी घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता, शिवसेनेने आघाडीधर्म पाळावा: लोंढे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे-फडणवीस यांच्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने बैठकीच्या सूचना

अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल!

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राहूल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबियांवर देखील अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले. पंडीत नेहरु हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. मात्र त्यांच्या वारसांना त्यांचे आडनाव वापरण्याची कसली भीती वाटते? असा सवाल करत आमच्याकडून कधी त्यांच्या नावाच उल्लेख राहीला तर ते आम्ही ठिक करु शकतो पण त्यांच्या वारसांना त्यांचे आडनाव वापरण्याची लाज वाटते अशी टीका त्यांनी केली.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी