29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयराजकारण पेटलं! शिंदे गटातील 'या' तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

राजकारण पेटलं! शिंदे गटातील ‘या’ तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

टीम लय भारी 

नवी मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात आमदार, खासदारांनंतर, नगरसेवक सुद्धा शिंदेगटाकडे वळू लागल्याने शिवसेनेत चांगलीच गळती सुरू झाली आहे. परंतु आता शिंदे गटात सुद्धा हेच चित्र दिसू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील तीन नगरसेवकांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे भाजपच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे.

नवी मुंबईतील दिघा येथील नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते या शिंदेगटातील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला असून भाजप आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. एकिकडे बंडखोरी करून शिवसेनेला हादरा देणाऱ्या शिंदे गटाला त्यांच्याच नगरसेवकांनी आता फटकारत भाजपचा रस्ता पत्करल्याने नामुश्की ओढावली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आमदार, खासदार, नगरसेवक आणि अगदी शिवसैनिकांना आपल्या बाजूला खेचत आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तब्बल 14 भाजप नगरसेवक, नगरसेविकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अनेक जागा रिकाम्या झाल्या, त्यामुळे याचा फायदा उचलत शिंदे गटातील तीन नगरसेवकांनी शिंदे गटाला रामराम ठोकत भाजपचा मार्ग पत्करला. शिवसेनेला डच्चू देण्याच्या नादाl शिंदे गटातील लोक आपल्याच नेत्याला डच्चू देत जोरदार झटका देत आहेत.

या संपुर्ण घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे त्यामुळे भविष्यात कोणाची कोणती भूमिका असणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

‘या‘ माफियांना कोणाचा आशिर्वाद ?

शिवाजीराव आढळराव यांनी फोडले संजय राऊत यांचे बिंग

’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ – रामदास कदम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी