28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीयपेट्रोल दराच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर भडकले

पेट्रोल दराच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर भडकले

टीम लय भारी 

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने आज (दि. 14 जुलै) इंधन दराबाबत मोठा निर्णय घेतला. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समाजमाध्यमांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र नव्या सरकारला खडसावून या निर्णयावर चांगलीच टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. पोस्टमध्ये आंबेडकर लिहितात, “हे श्रीमंतांचे सरकार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करून श्रीमंतांना दिलासा मिळाला पण, सर्वसामान्यांना जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा नाही.” असे म्हणून आंबेडकर यांनी सरकारच्या जाहीर केलेल्या निर्णयावरच यानिमित्ताने सवाल केला.

दरम्यान, इंधनाबरोबर अन्नधान्य, तेल आणि इतर दैनंदिन महत्त्वपूर्ण गोष्टींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत चालले आहेत. या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष करून सरकारने केवळ इंधनाचेच दर कमी केले आहेत. सर्वसाधारणपणे सधन कुटुंबाकडे वाहने असतात त्यामुळे या निर्णयाने केवळ याच वर्गाला दिलासा मिळाला आहे, परंतु इतर सर्वसामान्यांचे काय ज्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशांना केव्हा दिलासा मिळणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हाच मुद्दा लावून जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा नाही असे म्हणून शिंदे – फडणवीस सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला असून महत्त्वाच्या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.

हे सुद्धा वाचा…

नेमका कधी जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल ?

कोणाचे काय तर कोणाचे काय…? ‘आरे’च्या ‘कारे’वर सुमीत राघवनने केलेली प्रतिक्रिया वादात

भारतात आढळला दुर्मिळ रक्तगट; जगात केवळ 9 जणांशीच होतो मॅच

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!