31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयओबीसी आरक्षण विषयी विधेयक हे घटनाबाह्य, प्रकाश आंबेडकर

ओबीसी आरक्षण विषयी विधेयक हे घटनाबाह्य, प्रकाश आंबेडकर

टीम लय भारी

शिर्डी: राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचा निवडणुकीच्या तारखा म्हणजे निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार स्वत: कडे घेतला आहे. त्यामुळे हा घेतलेला निर्णय घटनाबाह्य असून, असं करता येत नसल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.(Prakash Ambedkar, OBC reservation is unconstitutional)

शिर्डी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते याबाबत बोलत होते. महाराष्ट्र राज्य सरकारने काल विधानसभेत मंजूर केलेलं हे विधेयक घटनाबाह्य आहे. प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा कुठलाही अधिकार राज्यघटनेने दिला नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना हे चोरांचे सरकार असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.

दरम्यान, आरक्षण प्रभागरचना ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेतले आहेत. निवडणूक आयोगाकडे आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाहीत.

मात्र, राज्य सरकारचा कुठलाही निर्णय मान्य करण्याच बंधन निवडणूक आयोगावार नाहीये त्यामुळे आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढे ते  या चार पक्षांना मतदान देणे बंद करून ओबीसींनी सत्ता हातात घेतली पाहिजे तरच आरक्षण टिकेल असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकराचा हिजाब वादावरुन भाजपावर निशाणा

प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा दमदार एंट्री

प्रकाश आंबेडकर मुस्लिम आरक्षणासाठी सरकार विरोधात मोर्चा काढणार

Ready for alliance with any party except NCP, BJP: VBA chief Prakash Ambedkar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी