26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरराजकीय'नरेंद्र मोदी बापात बाप लेकात लेक ठेवणार नाहीत,' प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

‘नरेंद्र मोदी बापात बाप लेकात लेक ठेवणार नाहीत,’ प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

देशात भाजप आणि इतर पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. यासाठी सर्वच पक्ष कसून तयारी करत आहेत. भाजपचे सरकार हटवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आता भाजपने पक्ष फोडून राजकारण करायला सुरुवात केली आहे. यामुळे काका पुतणे, तर अनेक मंत्री आता आपला स्वतःचा पक्ष सोडून भाजपशी युती करत आहेत. या प्रकरणात भाजपचे षडयंत्र असल्याचे बोलले जाते. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी यात उडी घेतली आहे.

भाजपचे काही नेते म्हणतात की, देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी केवळ दोन वर्षे पंतप्रधान म्हणून काम करतील, त्यानंतर ते हिमालयात निघून जातील, असेही बोलले जात आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी आताच निघून जाण्यासाठी सांगितले आहे. बीड येथील एका सभेत असताना प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केले होते.


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

पंतप्रधान पद मिळवल्यानंतर दोन वर्षानंतर नरेंद्र मोदी हिमालयात जाणार असल्याचे भाजपकडून बोलले जात आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन वर्ष कशाला आताच हिमालयाला जा, देशाचे भले होईल. नाहीतर हे लेक लेकात ठेवणार नाहीत, बाप बापात ठेवणार नाहीत. अशी अवस्था करून ठेवतील असे प्रकाश आंबेडकरांनी बीडच्या सभेत भाजप सडकून टीका केली आहे. तर पुढे त्यांनी काँग्रेसच्या युतीबाबतही वक्तव्य केले आहे.

हे ही वाचा

महिलांनो आता रस्त्यावर उतरा…असे का म्हणाले शरद पवार

शरद पवारांचा खेळच न्यारा… भुजबळ पवारांबद्दल काय बोलले?

भाजप आमदाराने शरद पवारांच्या केलेल्या एकेरी उल्लेखावर सुप्रिया सुळे चिडीचूप, पण वकिलावर मात्र भडकल्या !

काँग्रेसच्या युतीबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला युती करण्यासाठी नरेंद्र मोदींची परवानगी लागते. त्यांची परवानगी मिळाल्यास आपल्याशी प्रेम म्हणजेच युती करतील. मोदींनी परवानगी न दिल्यास ते त्यांच्या मार्गाने आपण आपल्या मार्गाने. असे बोलत काँग्रेसवरही त्यांनी टीकेचे बाण सोडले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी