27 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरराजकीयकॉँग्रेसच्या घोड्याची लगाम ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात : प्रकाश आंबेडकर

कॉँग्रेसच्या घोड्याची लगाम ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात : प्रकाश आंबेडकर

इंडिया आघाडीबद्दल बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, ‘काँग्रेसला आम्ही सांगितल आहे की, जशी आम्ही शिवसेने बरोबर जशी युती केली आहे, तशी आपल्याबरोबर करायला तयार आहोत. पण कॉँग्रेसचं घोडं कुठ पाणी पितय हेच कळायला मार्ग नाही. कॉँग्रेसच्या घोड्याची लगाम ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हातात असल्याचे दिसत आहे.’ अशी टीका त्यांनी केली.
वाढत्या जातीयता आणि धर्मांधतेतून सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राहुरी येथे बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगली घडविल्या जातील, समाजात फुट आणखी कशी वाढेल हे पहिल्या जाईल, त्यामुळे आताच निर्णय घ्या, आपलं मत आजच ठरवा आणि भाजप – आरएसएसची सत्ता उलथवून टाका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

मराठा अरक्षणबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘इथला गरीब मराठा या देशातला एक हिस्सा आहे. गरीब आहे त्याला श्रीमंत मराठा हा बघायला तयार नाही. उमेदवारी द्यायला तयार नाही, ग्रामपंचायती मध्ये सुद्धा उभा करायला तयार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जो फायदा होणार होता, त्याच ताट जर कोणी काढल असेल तर ते भाजपने काढलय हे आपण लक्षात घ्या. आता श्रीमंत मराठा तोंड देखलं लढण्याच नाटक करीत आहे.

हे सुद्धा वाचा 
एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

‘माझं आव्हान आहे शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना, मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टाच्या ऐरणीवर तुम्ही कसं आणणार आहात ते आधी सांगा. मी गरीब मराठ्यांना आवाहन करतो की तुम्ही वंचित सोबत या, गरीब मराठ्यांच्या सवलतीचा प्रश्न गव्हर्नर च्या माध्यमातून पुनः कोर्टाच्या टेबलवर घेऊन जाऊ. शरद पवार हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधि नाहीत तर ते कारखान्यांचे प्रतिनिधी आहेत हे आपण लक्षात घेतल पाहिजे. यांनी आतापर्यंत हमीभावाचा कायदा केला नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी