28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
HomeराजकीयOBC Reservation : उद्धव ठाकरेंचा ओबीसींबद्दल 'कल्याणकारी' निर्णय, प्रकाश शेंडगे यांनी मानले...

OBC Reservation : उद्धव ठाकरेंचा ओबीसींबद्दल ‘कल्याणकारी’ निर्णय, प्रकाश शेंडगे यांनी मानले आभार !

सर्वोच्च न्यायालयाने OBC समाजाला राजकीय आरक्षण लागू करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखविला. या निर्णयाची अचूक पायाभरणी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार व OBC नेते प्रकाश शेंडगे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने OBC समाजाला राजकीय आरक्षण लागू करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखविला. या निर्णयाची अचूक पायाभरणी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार व OBC नेते प्रकाश शेंडगे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत. ओबीसींचा डाटा जमा करण्यासाठी स्वतंत्र बांठिया आयोग नेमण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळेच ओबीसींना राजकीय आरक्षण (OBC Reservation) देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागला होता. त्या अनुषंगाने ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतल्याचे प्रकाश शेंडगे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’ची सत्ता असताना तत्कालिन ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्गीय आयोगाकडे डाटा जमा करण्याची जबाबदारी दिली होती. हा डाटा जमा करण्यासाठी आयोगाने राज्य सरकारकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. ही मागणी योग्य नव्हती. शिवाय अस्सल डाटा जमा करण्याची क्षमता आयोगाकडे नव्हती. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यावेळी भेट घेतली होती.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण टिकवण्यासाठी माझे आणि फडणविसांचे मजबूत नियोजन

माजी आमदार प्रकाश शेंडगे आक्रमक, ओबीसींच्या प्रश्नांवर आझाद मैदानात तीव्र आंदोलन सुरू !

ओबीसी आरक्षण विषयी विधेयक हे घटनाबाह्य, प्रकाश आंबेडकर

डाटा गोळा करण्यासाठी स्वतंत्र आयोगाची नियुक्ती करावी, अशी मागणी आम्ही त्यावेळी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार ठाकरे यांनी आमची मागणी मान्य करून बांठीया आयोगाची स्थापना केली होती. बांठिया आयोगाने आपले काम पूर्ण केले होते. त्या दरम्यान राज्यात राजकीय बदल झाला. उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले. पण उद्धव ठाकरे यांनी ओबीसींच्या दृष्टीने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयाचे आभार मानणे हे आमचे नैतिक कर्तव्य होते. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, व त्यांचे आभार मानल्याचे शेंडगे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी