28 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल, कोणत्या उमेदवाराला मिळणार पद?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल, कोणत्या उमेदवाराला मिळणार पद?

टीम लय भारी 

दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी पार पडली होती, त्यानंतर आज ( दि. 21 जुलै) या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीस सुरूवात झाली असून यंदा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने कौल लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यावेळी निवडणुकीत भाजप वर्तुळातून द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा असे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान भाजपच्या द्रौपदी मुर्मूच निवडणुकीत बहुमताने विजयाने होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू सदर निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळतील, तर प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर राष्टपतीपद सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरतील. 15 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 21 जुलै रोजी प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतीपदासाठी निवड करण्यात आली होती.

सर्वात आधी संसद भवनातील मतमोजणी करण्यात येणार आहे, तर त्यानंतर राज्यातील मतांची मोजणी होणार आहे. आजच्या या मतमोजणीनंतर द्रौपदी मुर्मू किंवा यशवंत सिन्हा यांच्यापैकी जो कोणी विजयी होईल त्यांच्या रुपात देशाला 16 वे राष्ट्रपती मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

बाळासाहेबांच्या नावाची निलेश राणेंना चिंता? उद्धव ठाकरेंना सुनावले खडे बोल

सोनिया गांधी ईडीच्या शिकार? आज मुंबईसह देशभरात काॅंग्रेसची निदर्शने

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!