34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका घ्यावी, श्रीमंत शाहू छत्रपतींचे वक्तव्य

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका घ्यावी, श्रीमंत शाहू छत्रपतींचे वक्तव्य

टीम लय भारी

मुंबई :- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यात या निकालाचे पडसाद उमटत असून, पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) या मूक आंदोलनात राज्यातील अनेक नेते, आमदार आणि खासदारांनी आंदोलनाला उपस्थिती लावली. मराठा आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हे मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती (Shrimant Shahu Chhatrapati) यांनी उपस्थितांना संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिल्लीत आवाज बुलंद करण्याची गरज व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनात बड्या नेत्यांचा सहभाग

राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी संघटना आक्रमक, उद्यापासून महिनाभर आंदोलन

Maratha agitation takes off, Uddhav government invites Sambhajiraje Chhatrapati for talks to find solution

“मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती आपल्याला समजायला हवी. त्यांच्यापर्यंत आपला मुद्दा पटवून द्यायला हवा. दिल्लीत भाजप आज बहुमतात आहे. पंतप्रधानपदी तिथे नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) बसलेत त्यांच्यापर्यंत आपला बुलंद आवाज पोहोचायला हवा. आपण बलाढ्या आहोत असे समजून दिल्लीत आवाज पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच दिल्लीत पाठपुरावा करायला हवा. समिती वैगेरे सगळे नाममात्र असतात पंतप्रधानांनी जर ठरवले तर ते सगळे करू शकतात”, असे श्रीमंत शाहू छत्रपती (Shrimant Shahu Chhatrapati) म्हणाले आहेत.

कोल्हापूरात झालेल्या या मूक आंदोलनात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

कुणाच्या आरक्षणावर गदा आणून मराठा समाजाला आरक्षण नको

“मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिले पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही”, असे सांगतानाच श्रीमंत शाहू छत्रपती यांनी इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर गदा आणून मराठा समाजाला आरक्षण नकोय. मराठा समाजासाठी स्वतंत्रच आरक्षण मिळायला हवे, मार्ग खूप खडतर आहे. पण अशक्य नाही. फक्त यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे श्रीमंत शाहू छत्रपती (Shrimant Shahu Chhatrapati) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी