38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
HomeराजकीयPM Narendra Modi : पंतप्रधानांनी घेतली मोरबी दुर्घटनेतील जखमींची भेट

PM Narendra Modi : पंतप्रधानांनी घेतली मोरबी दुर्घटनेतील जखमींची भेट

गुजरातमधील मोरबी येथे रविवारी नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 135 लाकांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल देखील उपस्थित होते. या दुर्घटनेत 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींची पंतप्रधानांनी विचारपूस केली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक देखील यावेळी पंतप्रधानांनी घेतली. यावेळी पंतप्रधानांनी बचावकार्य करणाऱ्यांशी देखील संवाद साधला, आणि त्यांच्या कार्याची आणि धाडसाची प्रसंसा केली.

दरम्यान सोमवारी रात्री पंतप्रधानांनी अधिकांऱ्यांसोबत एक बैठक देखील घेतली होती. यावेळी त्यांनी दुर्घनेतील मृतांच्या वारसांना आणि जखमींना सर्वौतोपरी मदत करण्याचे आदेश देखील दिली होते. बैठकीनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर राजभवनमध्ये एक उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोरबी पूलाच्या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याप्रति शोक व्यक्त करण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी शोक पाळण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. पटेल म्हणाले राज्यात सर्व सरकारी कार्यालयांवर 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय ध्वज आर्धा खाली आणला जाईल, तसेच कोणताही सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही.

दरम्यान या दुर्घटनेवरून गुजरातमधील सत्ताधारी भाजपवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने टीका केली आहे. पुलाच्या कामाच्या दर्जाच्या दर्जाची शहानिशा करण्या आधीच पूल खुला का केला याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे.दरम्यान या दुर्घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत नऊ लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटेल आहे की, पूल नियोजित वेळेआधी खोलने हे बेजबाबदारपणाचे होते.
हे देखील वाचा :

Skills University Education : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते कौशल्य विद्यापीठाचा शैक्षणिक शुभारंभ

Kiran Lohar ACB Raid : डिसले गुरुजींवर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार एसीबीच्या जाळ्यात

ShivSena : मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आठ दिवसांत राजीनामा देईन; आदित्य ठाकरे यांना सत्तारांचे आव्हान

या दुर्घटनेमध्ये 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिकजण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. क्षमतेहून अधिक लोकांना पूलावर प्रवेश दिला गेला, तसेच पुलावर लाकांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी अनेकांनी पुलावर उड्या मारल्या, पूलाच्या केबल्स ओढल्याचे देखील तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी